---Advertisement---

KKRच्या कर्णधाराचा मोठा डावपेच, गतवर्षी फ्लॉप ठरलेल्या ‘या’ खेळाडूला पहिल्याच सामन्यात उतरवणार मैदानात!

On: रविवार, एप्रिल 11, 2021 3:35 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात झाली आहे. या हंगामातील तिसर्‍या सामन्यात रविवारी (११ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. या सामन्यापूर्वी केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनसाठी अंतिम अकरा खेळाडूंची निवड ही एक मोठी समस्या बनली आहे. अनुभवी अष्टपैलू सुनील नरेनला पहिल्या सामन्यात संधी मिळेल का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

नरेनवर होत आहे टीका
सध्या टीकेचा धनी झालेला अष्टपैलू सुनील नरेन याच्या बचावासाठी कर्णधार ओएन मॉर्गन पुढे आला आहे. शाकिब अल हसनशी केलेल्या नरेनच्या तुलनेविषयी देखील तो बोलला.

मॉर्गनने नरेनच्या योगदानाचे कौतुक केले. सुनील नरेन २०१२ पासून केकेआर संघाचा भाग आहे. केकेआरने जिंकलेल्या दोन आयपीएल विजेतेपदात त्याचा मोलाचा वाटा होता. मात्र मागील आयपीएल हंगामात त्याची कामगिरी सरासरी राहिली होती. हंगामात १० सामने खेळताना त्याने अवघ्या १२१ धावा आणि ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याच्यावर संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे काही सामन्यांची बंदीदेखील घालण्यात आलेली.

कर्णधाराने केले कौतुक
केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गन याने नरेनच्या आतापर्यंतच्या योगदानाचे कौतुक करताना म्हटले, “माझ्या मते शाकिब आणि नरेन वेगवेगळे आहेत. त्यांची शैलीही निराळी आहे. नरेन सामन्याच्या महत्वपूर्ण क्षणांच्या वेळी विशेष योगदान देतो. कोणत्याही वेळी आपण त्याला फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी आणू शकतो. कारण तो वारंवार अशा परिस्थितीमध्ये खेळला आहे. त्याचा स्वतःवर विश्वास असून तो उत्कृष्ट कामगिरी करतो.”

याद्वारे ओएन मॉर्गनने नरेनला हैदराबादविरुद्धच्या हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात संधी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

नरेनची आयपीएल कारकीर्द
वेस्ट इंडीजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा नरेन आयपीएलमधील एक प्रमुख विदेशी खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत १२० आयपीएल सामन्यांमध्ये भाग घेतला असून त्यामध्ये १२७ बळी आपल्या नावे केले आहेत. तसेच फलंदाज म्हणून ८९२ धावा त्याच्या नावे आहेत. त्याच्या नावे आयपीएलमध्ये १६ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: ‘हा’ बडा खेळाडू वास्तवात बनलाय द्रविडच्या भयंकर रागाचा शिकार, विरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा

विजयाच्या जल्लोषात दुखापतीची चिंता; दिल्ली कॅपिटल्सचा ‘हा’ स्टार क्रिकेटपटू जखमी, दोन सामन्यांना मुकणार?

सेम टू सेम! दिल्ली-चेन्नई सामन्यात अश्विनने केदारच्या गोलंदाजीची केली हुबेहुब नक्कल, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---