---Advertisement---

एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे 4 खेळाडू, विराटने एकदा नाही, तर दोनदा केलाय रेकॉर्ड

On: रविवार, मार्च 12, 2023 3:35 PM
Virat-Kohli-Record
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू होऊन गेले आणि अजूनही आहेत, जे विरोधी संघांचा घाम काढण्याचा दम राखतात. यामध्ये भारतीय संघाचा धुरंधर विराट कोहली याच्या नावाचाही समावेश होतो. विराटने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023च्या चौथ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. हे त्याचे कसोटीतील 28वे शतक ठरले. विशेष म्हणजे, विराटने हे शतक करताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. विशेष म्हणजे, ही कामगिरी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच केली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने 241 चेंडूंचा सामना करत 100 धावा करत शतक केले. विराटने शतक करताना फक्त 5 चौकारांची बरसात केली. त्याने हे शतक करताच त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.

विराट कोहलीचा विक्रम
विराट कोहलीने शतक करताच तो एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. विराटने या शतकाच्या मदतीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या 16वे शतक झळकावले. तो या यादीत चौथ्या स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. त्यानेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच 20 शतके ठोकली होती. या यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी खेळाडू डॉन ब्रॅडमन (Don Bradman) असून त्यांनी इंग्लंडविरुद्ध 19 शतके केली होती.

तिसऱ्या स्थानी सचिनच असून त्याने श्रीलंकेविरुद्ध 17 शतके केली आहेत. यादीत पाचव्या स्थानी पुन्हा विराट असून त्याने श्रीलंकेविरुद्ध 15 शतकांचा पाऊस पाडला होता. या यादीत सहाव्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग असून त्याने भारताविरुद्ध 14 वेळा शतके मारले आहेत. (Most 100s against an Opponent virat kohli in the list)

एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
20 – सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
19 – डॉन ब्रॅडमन विरुद्ध इंग्लंड
17 – सचिन तेंडुलकर विरुद्ध श्रीलंका
16 – विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया*
15 – विराट कोहली विरुद्ध श्रीलंका
14 – रिकी पाँटिंग विरुद्ध भारत

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या 50 शतकांपेक्षा शेवटच्या 25 शतकांसाठी निघाला विराटचा घाम, आकडेवारीतून दिसतात परिश्रम
ना आक्रमकपणा, ना कुठला धांगडधिंगा! विराटने कसोटीतील 28वे शतक ठोकल्यानंतर खास अंदाजात केले सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---