राजकोट | भारत विरुद्ध विंडीज कसोटीतील पहिल्या सामन्यात विंडीजचा पहिला डाव १८१ धावांवर संपुष्टात आला. त्यात भारताकडून सर्व गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. परंतु आर अश्विनने ४ विकेट्स घेत यात मोलाचा वाटा उचलला.
याबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून एक विक्रमही केला आहे. कसोटीत डावात ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने ४२वेळा केला आहे.
आपला ६३वा सामना खेळणाऱ्या अश्विनने आजपर्यंत ३३२ विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटीत सर्वाधिक वेळा डावात ४ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज-
६६-अनिल कुंबळे, सामने- १३२
४२- आर अश्विन, सामने- ६३
४१- हरभजन सिंग, सामने- १०३
४० कपिल देव, सामने- १३१
महत्त्वाच्या बातम्या-
–वाढदिवस विशेष: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
–दोन्ही हातांनी गोलंदाजी करत या गोलंदाजाने रुट, मॉर्गनला टाकले गोंधळात
–भावनिक रविंद्र जडेजाने कसोटीतील पहिले शतक केले या व्यक्तीला समर्पित






