ऑकलंड | भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ विकेट्स आणि ७ चेंडू राखून शानदार विजय मिळवला. याचबरोबर भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
या सामन्यात कृणाल पंड्याला उत्कृष्ठ गोलंदाजीबद्दल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. याच सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली.
या खेळीमुळे रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक वेळा डावात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ९२ सामन्यात तब्बल २० वेळा असा पराक्रम केला आहे.
याबरोबर त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. विराटने ६५ टी२० सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा डावात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू-
२०- रोहित शर्मा
१९- विराट कोहली
१६- मार्टीन गप्टील
महत्त्वाची बातमी-
–तब्बल २०० सामने कमी खेळूनही रोहित धोनीला सरस
–जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती
–ना धोनी, ना विराट; रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वांना सरस