रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा खेळला गेला. विशेष म्हणजे, मालिकेतील पहिले दोन वनडे सामने जिंकत भारत तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेला क्लीप देण्यासाठी उतरला होता. या सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. या विक्रमात त्याने माजी कर्णधार एमएस धोनी याच्या विक्रमाची बरोबरी केली.
विराटचा विक्रम
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी सलामीवीर रोहित शर्मा 42 धावांवर बाद झाला असता, तिसऱ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीला उतरला. विराटने या सामन्यादरम्यान 85 चेंडूत शतक झळकावले. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 10 चौकारांचाही पाऊस पाडला. विराटच्या शतकामुळे भारतीय संघाची धावसंख्या 300 धावांच्या पार झाली. त्यापूर्वी विराटने 48 चेंडूत 5 चौकार मारत अर्धशतक साजरे केले होते. त्यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
𝐂𝐄𝐍𝐓𝐔𝐑𝐘 𝐟𝐨𝐫 𝐕𝐢𝐫𝐚𝐭 𝐊𝐨𝐡𝐥𝐢 🔥🔥
His 46th in ODIs and 74th overall 🫡🫡#INDvSL #TeamIndia pic.twitter.com/ypFI9fdJ2I
— BCCI (@BCCI) January 15, 2023
विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध वनडेत फलंदाजी करताना सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीत एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. विराटने 21 वेळा श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम केला.
Double delight for India 🤩#INDvSL | 📝: https://t.co/xh2Gaym1a4 pic.twitter.com/vltBuQkTw3
— ICC (@ICC) January 15, 2023
या यादीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अव्वलस्थानी आहे. सचिनने श्रीलंकेविरुद्ध वनडेत 25 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा चोपल्या आहेत. विराट आणि धोनी हे संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी असून त्यांनी प्रत्येकी 21 वेळा अशी कामगिरी केली आहे. यानंतर तिसऱ्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज सईद अन्वर असून त्याने 20 वेळा श्रीलंकेविरुद्ध 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची कामगिरी केली. (Most 50 Runs Score vs SL In ODI)
श्रीलंकेविरुद्ध वनडेत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारे फलंदाज
25 वेळा- सचिन तेंडुलकर
21 वेळा- विराट कोहली*
21 वेळा- एमएस धोनी
20 वेळा- सईद अन्वर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
षटकार किंग हिटमॅनच! श्रीलंकेविरुद्ध पहिला सिक्सर मारताच धोनीला ‘या’ यादीत टाकले मागे
पंजाबचा वाघ ऑस्ट्रेलियात चमकला! विक्रम रचूनही कुणालाच लागला नाही पत्त्या, जाणून घ्याच