भारतीय संघाचा नव्या दमाचा युवा फलंदाज शुबमन गिल याच्यासाठी 2023 हे वर्ष खूपच शानदार ठरले आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच शुबमन वेगाने धावांचा पाऊस पाडत आहे. अशात विश्वचषक 2023 स्पर्धेतही त्याने जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याने विश्वचषकातील आपल्या पाचव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावले. यासह त्याच्या नावावर जबरदस्त विक्रमाची नोंद झाली. 2023मध्ये अशी कामगिरी त्याच्याशिवाय कुणालाही जमली नाहीये.
शुबमन गिलने काय विक्रम केला?
गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघ आमने-सामने आहेत. हा विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील 33वा सामना आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताकडून सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याने 55व्या चेंडूवर चौकार खेचत अर्धशतक साजरे केले. यावेळी त्याच्या बॅटमधून 8 चौकारांचा पाऊसही पडला. गिलने अर्धशतक करताच तो विक्रमवीर बनला.
वनडे क्रिकेटमध्ये 2023 या वर्षात सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शुबमन गिल याने अव्वलस्थान गाठले. गिलने आतापर्यंत 12 वेळा ही कामगिरी केली आहे. गिलनंतर या यादीत श्रीलंकेचा विस्फोटक फलंदाज पथुम निसांका आणि पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी यावर्षी प्रत्येकी 11 वेळा अर्धशतके केली आहेत. यानंतर संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी रोहित शर्मा आणि विराट कोहली आहेत. या दोघांनीही यावर्षी वनडेत 10 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
वनडेत 2023 या वर्षात सर्वाधिक वेळा 50 हून अधिक धावा करणारे फलंदाज
12 – शुबमन गिल*
11- पथुम निसांका
11 – बाबर आझम
10- रोहित शर्मा
10 – विराट कोहली
भारत 25व्या षटकानंतर दीडशेच्या पार
या सामन्यात शुबमन गिलच्या आधी विराट कोहली (Virat Kohli) यानेही अर्धशतक झळकावले. त्यामुळे या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने 25व्या षटकांच्या खेळानंतर 1 विकेट गमावत 151 धावा चोपल्या. (Most 50+ scores in ODIs this year shubman gill on top ind vs sl cwc23)
हेही वाचा-
आशिया खंडातील ‘किंग’ विराटच! वानखेडेवर मोडला सचिनचा ‘तो’ Record
वानखेडेवर श्रीलंकेने भारताला दिलं फलंदाजीचं आमंत्रण, रोहितसेनेत कोणताही बदल नाही; पाहा Playing XI