---Advertisement---

‘हिटमॅन’ रोहित शर्मा ‘रनमशीन’ कोहलीला पडला भारी; मोडला हा मोठा विश्वविक्रम

---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। आज(2 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पाचवा आणि शेवटचा टी20 सामना बे ओव्हल स्टेडियमवर पार पडला आहे. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. तसेच 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. या विजयात भारताचा फलंदाज रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. तसेच एक खास विश्वविक्रमही केला आहे.

या सामन्यात रोहितने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितची ही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची 25 वी वेळ आहे. यामध्ये त्याच्या 4 शतकांचा आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्यामुळे आता तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकत अव्वल क्रमांकावर आला आहे.

विराटने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 24 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. यामध्ये विराटच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे खेळाडू-

24- रोहित शर्मा, सामने- 108

24- विराट कोहली, सामने- 82

17- मार्टिन गप्टील, सामने- 88

17 – पॉल स्टर्लिंग, सामने – 75

16 – डेव्हिड वॉर्नर, सामने – 76

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---