भारतीय महिला संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आयसीसी वनडे विश्वचषक २०२२ खेळण्यात व्यस्त आहे. शनिवारी (१२ मार्च) भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध विश्वचषकातील त्यांचा तिसरा सामना खेळला. या सामन्यात भारतीय महिलांनी जबरदस्त फलंदाजी प्रदर्शन केले. त्यातही उपकर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या प्रदर्शनाने सर्वांचेच लक्ष वेधले. तिने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत धुव्वादार शतक झळकावले. यासह तिने बरेचसे विक्रम आपल्या नावे केले आहेत.
सलामीवीर यस्तिका भाटिया (३१ धावा), कर्णधार मिताली राज (५ धावा) आणि दीप्ती शर्मा (१५ धावा) स्वस्तात बाद झाल्यानंतर हरमनप्रीत (Harmanpreet Kaur) पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. तिने या क्रमांकावर फलंदाजीला येत १०७ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने १०९ धावांची शानदार खेळी खेळली.
यासह ती वनडे विश्वचषकात (ICC Women’s World Cup 2022) चौथ्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारी (Most 50+ Scores In Women World Cup) पहिलीच फलंदाज बनली आहे. तिने आतापर्यंत सर्वाधिक सहाव्यांदा हा पराक्रम केला आहे. हरमनप्रीतनंतर कर्णधार मितालीचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. तिने ५ वेळा हा पराक्रम केला आहे. तर वेस्ट इंडिजची डिएंड्रा डॉटिन आणि इंग्लंडची नतालिया स्कॅव्हियर यांनीही प्रत्येकी ४ वेळा ही कामगिरी केली आहे. (Most 50+ scores in Women’s ODI World Cup batting at No.4 or below)
हरमनप्रीतने अजून एक विक्रम केला नावे
दरम्यान हरनमनप्रीत कौर हिने महिला विश्वचषक स्पर्धेत केलेले हे तिसरे शतक आहे. हरमनप्रीत ही एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे, जिने विश्वचषक स्पर्धेतत तीन शतके केले आहे. यापूर्वी स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) आणि कर्णधार मिताली राज (Mithali Raj) दोघींनी विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक दोन वेळा शतकी खेळी केली आहे.
त्याव्यतिरिक्त हरमनप्रीत ही एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे, जिने महिला टी-२० विश्वचषकात भारतासाठी शतक केले आहे. तिच्याव्यतिरिक्त एकही भारतीय खेळाडू महिला टी-२० विश्वचषकात शतक करू शकलेली नाही.
स्म्रीती मंधानाचेही शतक
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताकडून वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना हरमनप्रीतबरोबरच सलामीवीर स्म्रीती मंधाना हिनेही शतकी खेळी केली आहे. तिने ११९ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने १२३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हरमनप्रीतचा मोठा पराक्रम! १०९ धावांची खेळी करताच विश्वचषकात अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय
नादच खुळा! मंधना-हरमनप्रीतची विक्रमी १८४ धावांची भागीदारी, मोडला ९ वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम
स्म्रीती मंधनाचे रेकॉर्डब्रेक शतक! विश्वचषकात १२३ धावांच्या खेळीसह तीन विक्रमात पटकावले अव्वल स्थान