इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 62वा सामना गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात सोमवारी (दि. 15 मे) खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील या सामन्यात हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने यादरम्यान सर्वाधिक 5 विकेट्स घेत आपल्या नावावर खास विक्रमाची नोंद केली. असा विक्रम करणारा भुवनेश्वर हा हैदराबादचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
भुवनेश्वर कुमारचा विक्रम
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 188 धावांचा पाऊस पाडला. गुजरातच्या 9 विकेट्सपैकी 5 विकेट्स या एकट्या भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने घेतली. त्यामुळे त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. भुवनेश्वर अशी कामगिरी करणारा आयपीएल इतिहासातील तिसरा आणि हैदराबादचा पहिला खेळाडू बनला.
भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्सचे पंचक घेणारा तिसरा खेळाडू बनला. त्याच्याआधी हा विक्रम जयदेव उनाडकट आणि जेम्स फॉकनर यांनी केला होता. उनाडकटने दोन वेळा, तर फॉकनरनेही दोन वेळा आयपीएलमध्ये विकेट्सचे पंचक घेण्याची कामगिरी करून दाखवली आहे.
.@BhuviOfficial claimed a fantastic five-wicket haul for the second time in his IPL career as he becomes our 🔝 performer from the first innings of the #GTvSRH clash in the #TATAIPL 👌🏻
A look at his bowling summary 🔽 pic.twitter.com/64fKWnDaea
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2023
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्सचे पंचक घेणारे गोलंदाज
2 वेळा- भुवनेश्वर कुमार*
2 वेळा- जयदेव उनाडकट
2 वेळा- जेम्स फॉकनर
भुवनेश्वर कुमारच्या विकेट्स
या सामन्यात भुवनेश्वरने पहिले षटक टाकताना तिसऱ्याच चेंडूवर गुजरात संघाचा सलामीवीर वृद्धिमान साहा याला झेलबाद करून तंबूत धाडले. त्यानंतर भुवनेश्वरने डावातील 16व्या आणि आपल्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार हार्दिक पंड्या याला राहुल त्रिपाठीच्या हातून झेलबाद केले. यानंतर त्याने पुढील 3 विकेट्स या डावातील 20व्या आणि आपल्या चौथ्या षटकात घेतल्या. शतक झळकावणाऱ्या शुबमन गिल (58 चेंडूत 101 धावा) याला पहिल्याच चेंडूवर अब्दुल समदकडून झेलबाद केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तुफान फॉर्ममध्ये असलेल्या राशिद खान याला हेन्रीच क्लासेन याच्या हातून शून्यावर झेलबाद केले. तिसऱ्या चेंडूवरही विकेट मिळाली, पण ही संघाची हॅट्रिक झाली. यावेळी नूर अहमद हा धावबाद झाला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर पदार्पणवीर दसून शनाका याने 1 धाव घेतली. मात्र, पाचव्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या मोहम्मद शमी यालाही झेलबाद करून शून्यावर तंबूत पाठवले. तसेच, शेवटच्या चेंडूवर मोहित शर्मा याने एक धाव घेतली.
अशाप्रकारे भुवनेश्वरने अखेरच्या षटकात 2 धावा खर्च करत 3 विकेट्स नावावर केल्या. त्याने या सामन्यात एकूण 4 षटके गोलंदाजी करताना 30 धावा खर्च करत सर्वाधिक 5 विकेट्स नावावर केल्या. (Most 5fers in IPL History bhuvneshwar kumar also in the list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आशिया चषक आमच्याशिवाय झाला, तर आम्ही एकाच वेळी…’ PCB प्रमुखाची भारताला चेतावणी
जरा इकडे पाहा! ‘हे’ आहेत भारतातील 5 जादूई समालोचक; चौघांनी केलंय टीम इंडियाचं प्रतिनिधित्व