राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर गुरुवारी(7 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात दुसरा टी20 सामना(2nd T20I) पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत(T20I Series) 1-1 अशी बरोबरी केली आहे.
भारताच्या या विजयात प्रभारी कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) 43 चेंडूत 85 धावांची खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. या बरोबरच रोहितने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा(MS Dhoni) एक खास विक्रम मागे टाकला आहे.
रोहितचे टी20मध्ये भारताचा कर्णधार(Indian Captain) म्हणून आता 17 सामन्यात 37 षटकार झाले आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने धोनीच्या आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कर्णधार म्हणून मारलेल्या 34 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
विशेष म्हणजे या सामन्याआधी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत धोनी अव्वल क्रमांकावर होता. परंतू आता रोहितने टी20 क्रिकेटमध्ये धोनीला मागे टाकले आहे. असे असले तरी अजूनही वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये धोनी अव्वल क्रमांकावर आहे.
#या भारतीय कर्णधारांनी मारले आहेत सर्वाधिक षटकार –
कसोटी – एमएस धोनी (51 षटकार)
वनडे – एमएस धोनी (126 षटकार)
आंतरराष्ट्रीय टी20 – रोहित शर्मा (37 षटकार)
#आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय कर्णधार –
37 षटकार – रोहित शर्मा (17 सामने)
34 षटकार – एमएस धोनी (72 सामने)
26 षटकार – विराट कोहली (26 सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
विराट रन मशिन आहे तर रोहित सिक्स मशिन आहे, हा आहे पुरावा
वाचा???? https://t.co/dx9tETqDxV#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN #TeamIndia #Cricket #RohitSharma— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019
रोहितचा १००वा टी२० सामना टीम इंडियासाठीही ठरलाय खास, जाणून घ्या कारण
वाचा???? https://t.co/TB2EqUUGWe#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019
‘बाप योगायोग’- रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर बाबतीत जुळून आलाय अनोखा योगायोग
वाचा-???? https://t.co/9n54YAh5r9#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN #RohitSharma #HarmanpreetKaur— Maha Sports (@Maha_Sports) November 7, 2019






