‘मूर्ती लहान, कीर्ती महान’ असं आपण म्हणतो. याचं ज्वलंत उदाहरणही भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या वनडे सामन्यात मिळालं. ते म्हणजे इशान किशन याच्या रूपात. या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने पाहुण्या संघाला 7 विकेट्सने पराभवाचं पाणी पाजलं. या सामन्यात इशानने दाखवून दिले की, तो जरी युवा असला, तरीही त्याच्याकडे मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे. त्याने असा कारनामा केला, ज्यामुळे तो थेट एमएस धोनी, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांच्या यादीत सामील झाला.
https://twitter.com/BCCI/status/1579119852593508352
इशान किशन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली. तो या सामन्यात शतक पूर्ण करण्यापासून 7 धावांनी चुकला. यावेळी भारताकडून फलंदाजी करताना इशान किशन (Ishan Kishan) याने 84 चेंडूत 93 धावा केल्या. या धावा करताना त्याने 4 चौकार आणि 7 षटकारांची बरसात केली. त्याने मारलेल्या 7 षटकारांमुळे तो 24 वर्षांच्या वयात एका वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा पाचवा भारतीय खेळाडू बनला.
भारतीय खेळाडूंचा जलवा
इशानपूर्वी 24 वर्षांच्या वयात एका वनडे डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी एमएस धोनी आहे. धोनीने श्रीलंकेविरुद्ध खेळताना 10 षटकार मारले होते. त्याच्यानंतर 7 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर संयुक्तरीत्या सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रिषभ पंत हे खेळाडू आहेत. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, विराटनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि रिषभने इंग्लंडविरुद्धच्या एका वनडे डावात 7 षटकारांची बरसात केली होती.
इशान किशनची वनडे कारकीर्द
इशान किशन याच्या वनडे कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने फार सामने खेळले नाहीत. त्याने आतापर्यंत फक्त 8 वनडे सामने खेळले आहेत. यातील 7 डावात फलंदाजी करताना त्याने 36.71च्या सरासरीने 257 धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने 3 अर्धशतकेही झळकावली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 93 इतकी आहे.
वयाच्या 24व्या वर्षी एका वनडे डावात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय
10 षटकार- एमएस धोनी (श्रीलंका)
7 षटकार- सचिन तेंडुलकर (ऑस्ट्रेलिया)
7 षटकार- विराट कोहली (ऑस्ट्रेलिया)
7 षटकार- रिषभ पंत (इंग्लंड)
7 षटकार- इशान किशन (दक्षिण आफ्रिका)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेला पुरून उरलाय इशान, गांगुली अन् रोहितलाही न जमलेला पराक्रम पठ्ठ्यानं दाखवलाय करून
शानदार श्रेयस! बहारदार शतकासह अय्यरने कायम राखला ‘गोल्डन फॉर्म’