मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात आज(28 डिसेंबर) तिसऱ्या दिवसाशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताने 292 धावांनी आघाडी घेतली आहे.
या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने 33 धावांत 6 विकेट्स आणि मोहम्मद शमीने 27 धावांत 1 विकेट घेतली आहे. याबरोबरच या दोघांनी 2018 वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात 40 विकेट्स घेण्याचाही टप्पा पार केला आहे.
बुमराहने या वर्षात परदेशात 9 कसोटी सामन्यातील 17 डावात 45 विकेट्स घेतल्या आहेत. तर शमीने 11 कसोटी सामन्यात 20 डावात 43 विकेट्स घेतल्या आहेत.
त्यामुळे बुमराह आणि शमी हे दोघेही कसोटीमध्ये परदेशात खेळताना भारताकडून एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.
याआधी हा विक्रम भारताचा माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेच्या नावावर होता. त्याने 2006 मध्ये परदेशात 9 कसोटी सामन्यात खेळताना 17 डावात 41 विकेट्स घेतल्या होत्या.
विशेष म्हणजे एका वर्षात परदेशात 40 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी विकेट् घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये फक्त कुंबळे, बुमराह आणि शमीचा समावेश आहे.
एका वर्षात परदेशात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
45 विकेट्स – जसप्रीत बुमराह (2018)
43 विकेट्स – मोहम्मद शमी (2018)
41 विकेट्स – अनिल कुंबळे (2006)
39 विकेट्स – इरापल्ली प्रसन्ना (1968)
38 विकेट्स – इशांत शर्मा (2011, 2014)
महत्त्वाच्या बातम्या:
–जसप्रीत बुमराह कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई गोलंदाज
–विराट कोहलीच्या टीम इंडियाचे ते स्वप्न अखेर झाले पुर्ण
–कोहलीबरोबरचा हा किस्सा आहे वर्षातील सर्वात्तम, पहा व्हिडीओ