मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आयपीएलचा १५ वा हंगाम सुरु होत आहे. चाहते दरवर्षीप्रमाणे या हंगामासाठी उत्साही दिसत आहेत. १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोर येथे आयपीएलचा मेगा लिलाव पार पडणार आहे. यावर्षी आयपीएल २०२२ मध्ये ८ नाही तर १० संघ खेळणार आहेत. मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) सर्व संघांनी रणनिती आखली आहे. २००८ ला पहिला आयपीएल सामना खेळला गेला होता. तेव्हापासून आजपर्यंत लोकांमध्ये स्पर्धेबाबत उत्साह तसाच कायम आहे. आयपीएल ही चाहत्यांची आवडती स्पर्धा आहे. या लेखात आपण अशा आयपीएल संघांच्या मालकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची चर्चा स्टेडियमपासून ते सोशल मिडीयापर्यंत होते.
१. शिल्पा शेट्टी
बाॅलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी( shilpa shetty) राजस्थान रॉयल्सच्या माजी सहमालकांपैकी एक होती. पती राज कुंद्रा आणि तिने राजस्थान रॉयल्सचा ११.७ टक्के हिस्सा खरेदी केला होता. २००८ मध्ये शिल्पा शेट्टी राजस्थान रॉयल्सची सहमालक असताना शेन वॉर्नने आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. २००८ मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळली गेली. शिल्पा शेट्टीच्या संघ राजस्थान रॉयल्सने पहिलाच हंगाम जिंकला होता. ही अभिनेत्री अनेकदा संघाला चिअर करताना दिसली आहे.
२.काव्या मारन
काव्या मारन( kaviya maran) ही सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. तसेच माजी केंद्रिय मंत्री दयानिधी मारन यांची भाची आहे. सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यांदरम्यान काव्या नियमितपणे दिसत असते . तिला सनरायझर्स हैदराबाद संघाची ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणूनही ओळखले जाते. ती पहिल्यांदा आयपीएल २०१८ मध्ये संघाला चिअर करताना दिसली होती.
३. जूही चावला
बॉलीवूड स्टार जूही चावला (juhi chawla)२००८ पासून शाहरुख खानसोबत कोलकाता नाइट रायडर्सची सहमालक आहे. केकेआर हा दोनदा आयपीएल चॅम्पियन संघ बनला आहे. आयपीएल २०२१ च्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. ज्यामध्ये केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला होता.
४. प्रीती झिंटा
बॉलीवूड स्टार प्रीती झिंटा(preity zinta) २००८ पासून आयपीएलमध्ये पंजाब किंग्जची सहमालक आहे. प्रीती झिंटा आयपीएलमधील सर्वात सुंदर मालक मानली जाते. ती चाहत्यांना खुप आवडते. किंग्ज इलेव्हन पंजाब म्हणून सुरुवात केलेल्या पंजाब किंग्जला अद्याप एकही आयपीएल हंगाम जिंकता आलेला नाही. मात्र, २०२२ मध्ये पंजाब किंग्ज एका नव्या आशेने मैदानात उतरणार आहे. प्रीती झिंटा तिच्या संघाला पाठिंबा देते.
५. गायत्री रेड्डी
गायत्री रेड्डी (gayatri reddy) ही डेक्कन क्रॉनिकल प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि डेक्कन चार्जर्स आयपीएल संघाचे माजी मालक वेंकटराम रेड्डी यांची मुलगी आहे. तीला सुद्धा सर्वात सुंदर संघमालक मानले जाते. हा संघ २०१२ मध्ये सन ग्रुपला विकला गेला आणि आता ते सनरायझर्स हैदराबाद म्हणून ओळखला जातो. गायत्री रेड्डी अनेकदा संघाला चिअर करताना दिसली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘यंग इंडिया’च्या यशाचा ‘हा’ आहे सूत्रधार! कर्णधार यश धूलने केला खुलासा (mahasports.in)