कसोटी क्रिकेटशिवाय इतर क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेशनची भूमिका खूप महत्वाची असते. टी२० क्रिकेटमध्ये जर फलंदाज स्ट्राइक फिरवू शकला नाहीत आणि संघावर दबाव वाढतो. आयपीएलमध्ये बर्याचदा पाहिले गेले आहे की, बरेच फलंदाज निर्धाव चेंडू खेळतात आणि इतरांवर धावसंख्येचा वेग वाढवण्याचा दबाव येतो. टी२० मध्ये निर्धाव चेंडू खेळणे खूप निराशजनक असते.
आयपीएलसारख्या दर्जेदार स्पर्धांमध्ये खेळताना फलंदाज शक्य तितके निर्धाव चेंडू टाळण्याचा प्रयत्न करतात. आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकला का विक्रम हरभजन सिंगच्या नावावर आहे. मात्र, आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक निर्धाव चेंडू खेळणारे ३ फलंदाज कोण आहेत, हे फारच कमी लोकांना माहिती असेल. या लेखात आम्ही त्याच ३ फलंदाजांबद्दल सांगणार आहोत.
लेंडल सिमन्स
आयपीएल २०१५ च्या हंगामात वेस्ट इंडीजचा फलंदाज लेंडल सिमन्स मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. त्या हंगामात सिमन्स हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरलेला. त्या हंगामात मुंबईच्या विजेतेपदात सिमन्सने खूप महत्वाची भूमिका बजावलेली आणि त्याने १३ सामन्यांत ५४० धावा केलेल्या. त्या हंगामात सिमन्सने एकूण ४४१ बॉल खेळलेले, त्यामध्ये १९८ चेंडूत त्याला एकही धावा करता आली नव्हती.
राहुल द्रविड
कसोटी फलंदाज म्हणून आपला वेगळा ठसा उमटवणारा माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविडनेही आपल्या कारकीर्दीत आयपीएलचे ६ हंगाम खेळले. द्रविड आयपीएल कारकीर्दीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. द्रविड आयपीएलच्या एका हंगामात जास्तीत जास्त निर्धाव चेंडू खेळण्याच्या बाबतीत दुसर्या स्थानावर आहे. द्रविडने आयपीएल २०१३ मध्ये १८ सामन्यांत ४२५ चेंडूंचा सामना केला होता, त्यापैकी १९९ चेंडू त्याने निर्धाव खेळले होते. असे असूनही द्रविडने त्या हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
माईक हसी
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईल हसीनेही आयपीएल कारकीर्दीत जबरदस्त यश संपादन केले आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून सलामीचा फलंदाज म्हणून खेळताना त्याचा खेळ चांगलाच खुलत. हसीने आयपीएल २०१३ मध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली आणि त्या हंगामात ७३३ धावाांसह या स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. मात्र, हसीच्या नावे आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक निर्धाव चेंडू खेळण्याचा विक्रमही नोंदविला गेला. त्या हंगामात हसीने २०३ निर्धाव चेंडू खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भविष्यातील स्टार! ६ वर्षांच्या चिमुकल्याची फटकेबाजी पाहून व्हाल थक्क; माजी कर्णधारानेही केलंय कौतुक
धोनीविषयी प्रश्न विचारताच ‘असे’ दिले संजू सॅमसनने उत्तर
आजपर्यंत आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडू खेळले, पण ‘हा’ कारनामा करणारा एबी डिविलियर्स एकमेवच