---Advertisement---

INDvsNZ टी20 सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट झालेले खेळाडू, ‘या’ यादीत भारताचे दोन खेळाडू

On: रविवार, मार्च 8, 2026 4:49 PM
---Advertisement---

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकाच्या दहाव्या हंगामाला आज (८ मार्च) विजेता संघ मिळणार आहे. त्यासाठी भारत आणि न्यूझीलंड अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहेत. या सामन्याआधी दोन्ही संघांतील काही खास आकडेवारी पाहू. यामधील एक कामगिरी अशी आहे ज्यामध्ये एक खेळाडू अनेकदा टी२०मध्ये शून्यावर बाद झाला आहे.

या यादीत न्यूझीलंडचा अष्टपैलू मार्क चॅपमन सर्वात अव्वल स्थानावर आहे. त्याने २०२१ ते २०२६ दरम्यान भारताविरुद्ध ११ टी२० सामने खेळले आहेत. यादरम्यान तो तीनदा शून्यावर बाद झाला. तसे त्याने यामध्ये २०० धावा केल्या असून ६३ धावा ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च खेळी ठरली आहे.

या यादीत जेम्स नीशमचाही समावेश आहे. त्याने भारताविरुद्ध ५ टी२० सामने खेळले असता तो ४ डावांमध्ये दोनदा भोपळा न फोडता तंबूत परतला आहे. त्या सामन्यांमध्ये त्याने केवळ ६ धावा केल्या. यावरून भारतीय गोलंदाज त्याच्याविरुद्ध सरस ठरले असे दिसते.

भारतीय खेळाडूंचाही यामध्ये समावेश आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडविरुद्ध ६ सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४ डावांमध्ये फलंदाजी करताना तो दोन वेळा शून्यावर बाद झाला. तसेच त्याने एक अर्धशतकही केले असून एकूण ६० धावा केल्या आहेत.

अभिषेक शर्माही न्यूझीलंडविरुद्ध टी२०मध्ये शून्यावर परतला आहे. त्याने २०२६मध्ये ५ सामने खेळले असता दोनदा शून्यावर बाद झाला. असे असले तरी त्याची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्याने या सामन्यांमध्ये २४९च्या स्ट्राईक रेटने १८२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. सध्या तो टी२० विश्वचषकात धावा करण्यात अपयशी ठरत आहे. यामुळे आजच्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे.

शून्यावर बाद होण्याच्या यादीत न्यूझीलंडच्या आणखी एका खेळाडूचा समावेश आहे. टॉम ब्रूसने भारताविरुद्द ५ सामने खेळले असता दोनदा तो शून्यावर बाद झाला आहे. त्याने एकूण ३२ धावा केल्या आहेत.

सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रकारामध्ये सक्रिय भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होण्याच्या विक्रम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (३५) नावावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याची कामगिरी चांगली राहिली असून तो एकदाही त्यांच्याविरुद्ध टी२०मध्ये शून्यावर बाद झाला नाही. अनेकदा तो नाबाद राहिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---