इंडियन प्रीमियर लीगचा थरार येत्या ९ एप्रिल पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघामध्ये रंगणार आहे. तसेच स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी होणार आहे.या स्पर्धेत गेल्या १३ वर्षात अनेक विक्रम करण्यात आले आहेत. तसेच, असे ही काही लाजीरवाणे विक्रम झाले आहेत जे कोणताही संघ किंवा खेळाडू आपल्या नावावर करू पाहणार नाही.
एका सामन्यात सर्वात जास्त झेल सोडणारा क्षेत्ररक्षक : तुम्हाला हे ऐकुन विश्वास बसणार नाही की, हा विक्रम जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमधून एक, कायरन पोलार्डच्या नावावर आहे. मिचेल जॉन्सन ने टाकलेल्या चेंडूवर पोलार्डने सलग ३ चेंडूत ३ झेल सोडले होते. हा आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम आहे.
सर्वात कमी संघाच्या धावा : हा विक्रम २०१७ आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या नावावर केला होता. विराट कोहली कर्णधार आरसीबी संघ अवघ्या ४९ धावांवर सर्वबाद झाला होता. तसेच सर्वाधिक संघाच्या धावा करण्याचा विक्रम देखील याच संघाच्या नावावर आहे.
सर्वात जास्त सामने गमावणारा संघ : हा लाजिरवाणा विक्रम दिल्ली डेयरडेविल्स संघाने आपल्या नावावर केला आहे. स्टार खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली संघाला ७ वेळेस प्लेऑफचा पल्ला गाठण्यास अपयश आले होते.
सर्वात जास्त धावा देणारा गोलंदाज : हा लाजिरवाणा विक्रम सनरायजर्स हैदराबाद संघाचा गोलंदाज बसिल थंपीच्या नावावर आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ४ षटक गोलंदाजी करत तब्बल ७० धावा खर्च केल्या होत्या.
पॉवरप्ले षटकांमध्ये सर्वात कमी धावा : साल २००८ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने हा कारनामा केला होता. त्यांनी पॉवरप्लेच्या षटकांमध्ये अवघ्या १४ धावा केल्या होत्या. ही आतापर्यंतची आयपीएल इतिहासातील पॉवरप्लेच्या षटकांमधील सर्वात निराशाजनक कामगिरी आहे.
सर्वधिक वेळेस शून्य धावांवर बाद होणारे फलंदाज : ही निराशाजनक कामगिरी हरभजन सिंगने केली आहे. तो आयपीएल इतिहासात आतापर्यंत १३ वेळेस ० धावांवर बाद झाला आहे.
शून्य धावांवर बाद होण्याची हॅट्रिक करणारे फलंदाज : ही निराशाजनक कामगिरी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर याने केली होती. गंभीर आयपीएल स्पर्धेत सलग ३ वेळेस शून्य धावांवर बाद झाला आहे, असा कारनामा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोईन अलीने दारुच्या कंपनीचा लोगो जर्सीवरुन हटवण्याची केली होती मागणी? चेन्नईचे सीइओ यांनी दिले उत्तर
भारतातील पहिल्या महिला समालोचक चंद्रा नायडू यांचे निधन; महान क्रिकेटपटू सीके नायडूंशी होते ‘हे’ नाते
धक्कादायक! एक धावेने अर्धशतक हुकले, फलंदाजाने क्षेत्ररक्षकाला बॅटने चोपले; अजूनही आहे कोमात