आयपीएल म्हटलं की सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचते. मग खेळाडूंच्या लिलावापासून ते शेवटी कोणता संघ विजयी ठरतो इथपर्यंत सर्व गोष्टींवर प्रेक्षकांचे लक्ष असते. कोणत्या खेळाडूला लिलावात किती रक्कम मिळाली, कोणत्या संघात नवीन खेळाडूची भर पडली किंवा कोणता खेळाडू या संघातून त्या संघात गेला, हे सर्व काही जाणून घेणे आयपीएल प्रेंमीना महत्त्वाचे वाटते .
२००८ पासून सुरु झालेल्या आयपीएलचे आतापर्यंत १२ हंगाम पूर्ण झाले आहेत. यंदा आयपीएल २०२० कोरोना व्हायसरमुळे अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहे.
या लेखात आपण त्या भारतीय खेळांडूविषयी जाणून घेणार आहोत, जे आयपीएल इतिहासाच्या प्रत्येक हंगामात सर्वात महागडे ठरले आहेत. Most expensive indian player from each ipl season.
आयपीलच्या प्रत्येक हंगामात सर्वात महागडा ठरलेला भारतीय खेळाडू –
आयपीएल २००८ : एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्स), ९.५ कोटी रुपये –
२००७मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला ९.५ कोटी रुपयांना संघात घेतले होते. आयपीएलच्या पहिल्या हंगामानंतर आतापर्यंत धोनी एकदाही लिलाव उपलब्ध नव्हता.
धोनी आताही चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे. मात्र, २०१६ आणि २०१७मध्ये सीएसकेवर बंदी घालण्यात आल्याने धोनी राइजिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला होता. तरी, धोनीच्या नेतृत्वाखाली २०१०, २०११ आणि २०१८मध्ये सीएसकेने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तसेच, त्याच्या नेतृत्वाखाली सीएसके ८ वेळा अंतिम सामन्यापर्यंत गेला आहे.
आयपीएल २०१० : मोहम्मद कैफ (किंग्स इलेव्हन पंजाब), १.५ कोटी –
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि शानदार क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ हा आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. मात्र, २००९मध्ये त्याला संघातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पुढील हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला १.५ कोटींना विकत घेतले होते. यासह तो आयपीएलच्या तिसऱ्या हंगामातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
पुढे २०११ ते २०१३पर्यंत कैफ आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता.
आयपीएल २०११ : गौतम गंभीर (कोलकाता नाईट रायडर्स), १४.५ कोटी –
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा खासदार गौतम गंभीर हा आयपीएलच्या पहिल्या ३ हंगामात दिल्ली डेअरडेविल्सचा भाग होता. त्यानंतर २०११मध्ये झालेल्या खेळाडूंच्या लिलावत तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. कोलकाता नाईट रायडर्सने गंभीरला आयपीएलच्या चौथ्या हंगामात १४.५ कोटींना संघात घेतले होते.
२०१२ आणि २०१४मध्ये गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरला आयपीएलचे चषक जिंकून दिले होते.
आयपीएल २०१२ : रविंद्र जडेजा (चेन्नई सुपर किंग्स), १२.८ कोटी –
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा हा आयपीएलच्या पहिल्या हंगमापासून राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. २०११मध्ये तो कोची टस्कर्स केरळ संघाकडून खेळला. त्यानंतर २०१२साली झालेल्या खेळाडूंच्या लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्सने १२.८ कोटींना संघात घेतले. यासह जडेजा आयपीएलच्या ५व्या हंगंमातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
२०१६-१७मध्ये जडेजा गुजरात लायन्सचा भाग होता. याशिवाय उर्वरित हंगामात तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे.
आयपीएल २०१३ : अभिषेक नायर (पुणे वॉरियर्स इंडिया), ४.८ कोटी –
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक नायर हा आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग होता. मात्र, २०१३साली पुणे वॉरियर्स इंडिया संघाने त्याला ४.८ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यामुळे नायर हा आयपीएलच्या ६व्या हंगमातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
नायरला आयपीएलमध्ये विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने आयपीएलमध्ये एकूण ६० सामने खेळले आहेत. यात त्याने ६७२ धावा आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत. नायरने २०१४ला राजस्थान रॉयल्सकडून शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.
आयपीएल २०१४, १५ आणि १६ : युवराज सिंग (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- १४ कोटी, दिल्ली डेअरडेविल्स- १६ कोटी आणि सनराइजर्स हैद्राबाद- ७ कोटी) –
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग हा आयपीलच्या पहिल्या 3 हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. त्यानंतर २०११पासून ते २०१३पर्यंत तो पुणे वॉरियर्स इंडिया संघाचा भाग होता. पुढे आयपीएल २०१४सालच्या खेळांडूंच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला सर्वात महाग, १४ कोटी रुपयांना विकत घेतले.
तर, २०१५मध्ये झालेल्या लिलावात सर्व विक्रमांना मोडून टाकले. युवराजला दिल्ली डेअरविल्सने आयपीएलच्या ८व्या हंगामात १६ कोटी रुपयांना विकत घेतले. एवढेच नव्हे तर, २०१६मध्येही युवराज हंगामातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला होता. त्यावेळी सनराइजर्स हैद्राबादने त्याला ७ कोटींना विकत घेतले होते. तसेच त्याच्या संघाने त्याच हंगामात आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.
आयपीएल २०१७ : कर्ण शर्मा (मुंबई इंडियन्स), ३ कोटी २० लाख –
कर्ण शर्मा हा २०१६मध्ये सनराइजर्स हैद्राबादच्या विजयी संघाचा भाग होता. पण त्यानंतर त्याला संघातून कायम ठेवण्यात आले नाही. असे झाले तरी, २०१७मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ३ कोटी २० लाख रुपयांना संघात घेतले. यामुळे तो हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
आयपीएलच्या १०व्या हंगामात तो मुंबई इंडियन्सच्या विजयी संघाचा भाग ठरला. तसेच, २०१८मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या विजयी संघाकडूनही तो खेळला आहे.
आयपीएल २०१८ आणि १९ : जयदेव उनाडकट (राजस्थान रॉयल्स), ११ कोटी ५० लाख आणि ४० लाख –
२०१७साली आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारा भारतीय खेळाडू म्हणजे जयदेव उनाडकट. त्याच्या कामगिरीमुळे २०१७मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला ११ कोटी ५० लाखांना संघात घेतले होते. यासह तो आयपीएलच्या ११व्या हंगामातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. पण त्याचे प्रदर्शन चांगले न राहिल्याने त्याला पुन्हा लिलावाला सामोरे जावे लागले.
तरी, २०१९मध्ये परत राजस्थान रॉयल्सने त्याला ८ कोटी ४० लाख रुपयांना विकत घेतले आणि तो आयपीएलच्या १२व्या हंगामातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
ट्रेंडिंग घडामोडी-
खराब खेळपट्टीमुळे रद्द केलेले ३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, २ आहेत भारतातील
५ अतिशय विचित्र गोलंदाजी शैली, ज्या पाहुन प्रेक्षकांना यायचे जोरदार…
पाकिस्तानच्या खेळाडूला टीम इंडियाचं कोच बनून करायचं आहे हे काम