---Advertisement---

पाकिस्तानच्या खेळाडूला टीम इंडियाचं कोच बनून करायचं आहे हे काम

On: मंगळवार, मे 5, 2020 12:47 PM
---Advertisement---

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. आता अख्तरने मजेशीर वक्तव्य केले आहे ज्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनायचे आहे. जेणेकरून भारतीय संघातही त्याच्यासारखे वेगवान गोलंदाज तयार होतील.

हॅलो ऍपला दिलेल्या विशेष मुलाखतीत अख्तर (Shoaib Akhtar)  म्हणाला की, “भारतीय संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांसारखे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. संधी मिळाली तर मी भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनायला आवडेल. जेणेकरून मी भारतातही माझ्यासारखे वेगवान गोलंदाज बनवू शकेल.”

अख्तर पुढे म्हणाला की, “जर मला आयपीएलमध्ये गोलंदाज प्रशिक्षक बनण्याची संधी मिळाली तर तो कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात सामील होईल.”

अख्तरने यावेळी भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) प्रशंसादेखील केली. तो म्हणाला की, “पंड्यामध्ये जागतिक दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बनण्याची क्षमता आहे.” तसेच तो पुढे म्हणाला की, “हरभजन सिंग आणि युवराज सिंगदेखील माझे चांगले मित्र आहेत.”

याबरोबरच त्याने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याबद्दलही आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, “सचिन आणि गावसकर महान खेळाडू होते. तसेच सचिनपेक्षा द्रविडची विकेट घेणे सर्वात कठीण होते.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-धोनी- रोहित कर्णधार म्हणून संघातील खेळाडूंवर ठेवतात विश्वास तर कोहली…

-क्रिकेट इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारे ३ गोलंदाज

-एकाच संघात एकाचवेळी खेळलेले टाॅप ५ स्पर्धक खेळाडू, जे आहेत चांगले मित्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---