---Advertisement---

वयाच्या २२ व्या वर्षी असा कारनामा करणारा शुबमन गिल चौथा भारतीय; दिग्गजांच्या यादीत मिळाले स्थान

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 3:18 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत असलेल्या २२ वर्षीय शुबमन गिलच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावरून माघार घ्यावी लागली होती. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर तो दुखापतग्रस्त असल्याचे आढळून आले होते. आता न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याने जोरदार पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात त्याने तुफानी अर्धशतक झळकावले आहे.

ही मालिका सुरू होण्यापूर्वी शुबमन गिल मध्यक्रमात फलंदाजी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्यानंतर शुबमन गिलला मयांक अगरवाल सोबत डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली. या संधीचा लाभ घेत, त्याने ९३ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ५२ धावांची खेळी केली.

या खेळीसह तो २२ व्या वर्षापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणारा चौथा भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत ४ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने माधव आपटे यांची बरोबरी केली आहे.

या यादीत सर्वोच्च स्थानी लिटिल मास्टर सुनील गावसकर आहेत. सुनील गावसकरांनी वयाच्या २२ व्या वर्षापर्यंत ९ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा केला होता, तर दिनेश कार्तिकने ६, एमएल जैसिम्हाने ५ वेळेस ने हा कारनामा केला होता.

वयाच्या २२ व्या वर्षापर्यंत सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे भारतीय सलामीवीर फलंदाज 
९ वेळेस – सुनील गावसकर
६ वेळेस – दिनेश कार्तिक
५ वेळेस – एमएल जैसिम्हा
४ वेळेस – शुबमन गिल*
४ वेळेस – माधव आपटे

महत्त्वाच्या बातम्या – 

मूर्ती लहान कीर्ती महान!! अवघ्या १२५ चेंडूंमध्ये १३ वर्षीय फलंदाजाने चोपल्या ३३१ धावा

“ही तर सुरुवात आहे मित्रा, तुझा अभिमान वाटतो”, श्रेयस अय्यरला दिग्गज कर्णधार पाँटिंगकडून मिळाल्या शुभेच्छा

“राहुल द्रविड टीम इंडियात आणेल स्थैर्य”, दिग्गज भारतीय क्रिकेटरला विश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---