---Advertisement---

चौकाराने आयपीएलमध्ये धावांचा श्रीगणेशा करणाऱ्यांच्या यादीत रोहित आहे ‘या’ स्थानावर

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 8:32 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये आयपीएलचा १३वा सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार केला. असे करताना त्याने खेळत असलेल्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारला.

आयपीएलमध्ये चौकाराने खाते उघडण्याची त्याची ही १८वी वेळ होती. या सामन्यात किंग्ज ११ पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय़ घेतला. मुंबईकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या रोहितने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीला खणखणीत चौकार मारत एक खास विक्रम केला. तो आयपीएलमध्ये ५ हजार धावा करणारा तिसरा खेळाडू झाला.

रोहितने केली विराट-धवनच्या विक्रमाची बरोबरी
आयपीएलमध्ये चौकाराने धावांचे खाते उघडणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली व शिखर धवनने हा पराक्रम १८ वेळा केला आहे. विराट कोहलीने तर केवळ रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून खेळतानाच हा पराक्रम केला आहे. यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा व शिखर धवन सध्या या खास विक्रमाच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.

सेहवाग- उथप्पाचा जलवा
जगातील विस्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या विरेंद्र सेहवागने आयपीएलमध्ये तब्बल १९ वेळा चौकाराने धावांचे खाते उघडले आहे. तर मधल्या फळीतील फलंदाज रॉबिन उथप्पानेही सेहवागप्रमाणेच १९ वेळा हा पराक्रम केला आहे. रॉबिन उथप्पाला सेहवागचा हा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे विराट कोहली, रोहित शर्मा व शिखर धवन देखील या खास विक्रमात अव्वल स्थानी येऊ शकतात.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चौकाराने धावांचे खाते उघडणारे फलंदाज
१९- विरेंद्र सेहवाग, रॉबिन उथप्पा
१८- विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन
१७- ब्रेंडन मॅक्क्युलम

वाचा- एकच फाईट वातावरण टाईट.! एका खणखणीत चौकारासह रोहितने रचला मोठा इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---