---Advertisement---

वयाच्या तिशीपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज

On: शुक्रवार, ऑक्टोबर 5, 2018 6:47 PM
---Advertisement---

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज(5 आॅक्टोबर) दुसऱ्या दिवसाखेर विंडिजने पहिल्या डावात 29 षटकात 6 बाद 94 धावा केल्या आहेत.

तसेच भारताने पहिला डाव 9 बाद 649 धावांवर घोषित केला आहे. भारताकडून आज या डावात कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने शतक केले आहे. कोहलीचे हे 24 वे कसोटी शतक आहे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 59 वे शतक आहे.

त्यामुळे तो वयाचे तीस वर्षे पूर्ण करण्याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

त्याने या सामन्यात 230 चेंडूत 139 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार मारले. हे शतक त्याने वयाच्या 29 वर्षे 334 दिवसाचा असताना केले आहे.

वयाचे तीस वर्षे पूर्ण करण्याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने वयाची तीस वर्षे पूर्ण करण्याआधी 65 शतके केली केली होती.

वयाचे तीस वर्षे पूर्ण करण्याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज- 

65 शतके – सचिन तेंडुलकर

59 शतके – विराट कोहली

35 शतके – जॅक कॅलिस/ रिकी पॉन्टींग

34 शतके – एबी डिविलिएर्स

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment