भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022मध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात भारताने शानदार विजय मिळवले आहेत. यातील पहिला सामना भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. तसेच, दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळला. यासह भारतीय क्रिकेट संघाने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने खेळण्याचा आपलाच विक्रम मोडला. चला तर भारताने आतापर्यंत किती सामने खेळलेत ते पाहूया.
पाकिस्तानविरुद्ध 4 विकेट्सने विजय
भारतीय संघाने टी20 विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. हा भारताचा एका कॅलेंडर वर्षातील एकूण 56वा सामना होता. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 159 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शेवटच्या चेंडूवर धाव घेत हा सामना 4 विकेट्सने आपल्या खिशात घातला. या सामन्यात भारताकडून विराट कोहली याने सर्वाधिक 84 धावा चोपल्या होत्या. या धावा त्याने 53 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या यानेही 40 धावांचे योगदान दिले होते.
What a game of cricket! 👊🏻
India win a humdinger at the MCG 🤩 #T20WorldCup | #INDvPAK | https://t.co/dD7AVhbZ8g pic.twitter.com/qacE7DYfEX
— T20 World Cup (@T20WorldCup) October 23, 2022
नेदरलँड्सविरुद्ध 56 धावांनी विजय
गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध भारताने 56 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 2 विकेट्स गमावत 179 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सला 9 विकेट्स गमावत 123 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताला या सामन्यात सहजरीत्या विजय मिळवता आला. भारताकडून या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतक साकारले.
T20 WC 2022. India Won by 56 Run(s) https://t.co/Zmq1aoJthi #INDvNED #T20WorldCup
— BCCI (@BCCI) October 27, 2022
एका कॅलेंडर वर्षात भारताचे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने
टी20 विश्वचषकातील हे दोन सामने खेळताच भारताने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम रचला. या दोन सामन्यानंतर भारताचे 2022 या वर्षात आतापर्यंत 57 आंतरराष्ट्रीय सामने खेळून झाले. यापूर्वी भारताने एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने 2007मध्ये खेळले होते. त्याआधी भारताने 1999, 2017 आणि 2018 या वर्षांमध्ये प्रत्येकी 53 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते.
भारताने एका कॅलेंडर वर्षात खेळलेले सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने
57 सामने- 2022*
55 सामने- 2007
53 सामने- 1999
53 सामने- 2017
53 सामने- 2018
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुलच्या खराब निर्णयावर स्पष्टच बोलला सेहवाग; म्हणाला, ‘फॉर्ममध्ये नाहीये तर…’
जिंकलो रे! नेदरलँड्सला पराभूत करत भारताची विजयी घोडदौड सुरूच, 56 धावांनी सामना घातला खिशात