भारतीय कर्णधार आणि तिन्ही प्रकारात अफलातून फलंदाजी करणारा विराट कोहलीने आज आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९ वर्षे पूर्ण केली आहेत. विराटने आजवर एकदिवसीय कसोटी आणि टी -२०मध्ये अनेक विक्रम मोडले आहेत. पण ९ वर्ष आधी जेव्हा विराटने आपला पहिला सामना खेळला तेव्हा कोणाला याची कल्पनाही नव्हती. विराटने जेव्हा भारतासाठी पहिला सामना खेळला तेव्हा त्याचे वय फक्त १८ होते.
९ वर्षांपूर्वी १८ ऑगस्ट २००८ साली विराटने डम्बुला येथे श्रीलंका संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मधल्या काळात कसोटी क्रिकेट हे मोठ्या प्रमाणावर बदलले. परंतु या काळात जवळजवळ सर्वच क्रिकेट प्रकारात विराटचीच चलती राहिली आहे.
एकदिवसीय क्रिकेट विराट’मय
विराटच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर जागतिक क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात सार्वधिक धावा करणारा, सार्वधिक चेंडू खेळणारा, सार्वधिक शतके करणारा, सार्वधिक ५०+ धावा करणारा खेळाडू हा विराट आहे.
गेल्या ९ वर्षातील खेळाडूंची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी
धावा- ८२५७, सामने-१८९ विराट कोहली
धावा-७४९४, सामने-१७९ कुमार संगकारा
धावा-७३४०, सामने-१८२ तिलकरत्ने दिलशान
धावा- ७१७२, सामने-१५५ एबी डिव्हिलिअर्स
विराटने आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यांनतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सार्वधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर आहे. तो कुमार संगकारापेक्षा आता केवळ ११९ धावांनी मागे आहे. विराटने आजपर्यंत २९८ सामन्यात १४६६३ धावा केल्या आहेत. याच काळात संगकाराने २८५ आंतरराष्ट्रीय सामन्यात १४७८२ धावा केल्या आहेत.
विराटच्या पदार्पणानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सार्वधिक धावा करणारे खेळाडू
धावा-१४७८२, कुमार संगकारा
धावा-१४६६३, विराट कोहली
धावा-१४६४१, हाशिम अमला
धावा-१२११८, तिलकरत्ने दिलशान