दिल्ली | शनिवारी दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात बेंगलोरने दिल्लीवर राॅयल विजय मिळवला. दिल्लीने २० षटकांत दिलेलं १८२ धावांच आव्हान बेंगलोरने १ षटक राखत ५ विकेटने गमावत पार केले.
या सामन्यात राॅयल चॅलेंजर बेंगलोरकडून कर्णधार विराट कोहलीने ४० चेंडूत ७० तर एबी डीविलियर्सने ३७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. डीविलियर्सने यात ६ षटकार आणि ४ चौकार खेचले.
त्यालाच या सामन्यात सामनाविर म्हणुन गौरविण्यात आले. त्याचा हा आयपीएलमधील १७वा सामनावीर पुरस्कार होता. त्याला १३८ सामन्यात १७व्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.
काही दिवसांपुर्वी सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याच्या १६ पुरस्कारांची बरोबरी युसुफ पठाणने केली होती. परंतु काल हा पुरस्कार मिळवत त्याने पुन्हा दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
या यादीत १०९ सामन्यात २० पुरस्कारांसह ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनीवीर पुरस्कार मिळवणारे खेळाडू-
२०- ख्रिस गेल
१७- एबी डिविलियर्स
१६- युसूफ पठाण, रोहित शर्मा
१५- डेविड वार्नर
१४- एमएस धोनी, सुरेश रैना
१३- गौतम गंभीर
१२- माईक हसी, अजिंक्य रहाणे
महत्त्वाच्या बातम्या-
-टाॅप ५- या खेळाडूंनी आयपीएलमध्ये केली शतके, परंतु त्यांच्या टीमचा झाला पराभव
-अादिवासी भागातील मुलांनी अनुभवली सचिनची १०,००० धावा केलेली बॅट
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६ – विचित्र शैलीचा मोहंती