क्रिकेटच्या कसोटी, वनडे आणि टी२० या प्रत्येक प्रकारात कर्णधाराची भूमिका ही त्याच्या संघासाठी खूप महत्त्वाची असते. एखादा संघ सामना जिंकला किंवा पराभूत झाला, तर त्यावेळी कर्णधाराला जबाबदार धरले जाते. काहीवेळा कर्णधार आपल्या संघाला सामना जिंकून देण्यासाठी आवश्यक ती महत्त्वाची कामगिरी करतो. पण काही वेळा त्याला आपले १०० टक्के योगदान देता येत नाही. त्यावेळी कर्णधारावरही दबावाची परिस्थिती निर्माण होते.
जगप्रसिद्ध टी२० क्रिकेट लीग आयपीएलबद्दल बोलायचं झालं, तर आयपीएल हा टी२० क्रिकेट प्रकार असल्यामुळे येथे सामन्याचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये लागतो. अशावेळी कर्णधाराची कसोटी लागलेली असते. त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाच्या प्रसंगी निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी अनेकदा कर्णधाराचा अनुभव कामी येतो. कर्णधाराने जितके अधिक सामने खेळले असतील तितकाच त्याचा अनुभव जास्त असतो. या अनुभवाचा फायदा त्याला सामन्यावेळी रणनीति आखताना होतो,
आम्ही तुम्हाला या लेखात आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंविषयी सांगणार आहोत.
आतापर्यंत आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
१. १७७ सामने- एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स)
आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एमएस धोनीने आतापर्यंत म्हणजेच २००८ ते २०२० या आयपीएल हंगामादरम्यान कर्णधार म्हणून सर्वाधिक १७७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला १०५ सामन्यात विजय मिळाला आहे, तर ७१ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याव्यतिरिक्त १ सामना अनिर्णित राहिला आहे. हे सर्व सामने त्याने चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघांकडून खेळले आहेत.
२. १२९ सामने- गौतम गंभीर (दिल्ली डेअरडेविल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स)
यानंतर आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये गौतम गंभीरचा दुसरा क्रमांक लागतो. गंभीरने २००९ ते २०१८ या आयपीएल हंगामादरम्यान कर्णधार म्हणून सर्वाधिक १२९ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ७१ सामन्यात विजय मिळाला आहे, तर ५७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याव्यतिरिक्त १ सामना बरोबरीत सुटला आहे. हे सर्व सामने त्याने दिल्ली डेअरडेविल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळले आहेत.
३. ११३ सामने- विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
विराट कोहलीने २०११ ते २०२० या आयपीएल हंगामादरम्यान कर्णधार म्हणून सर्वाधिक ११३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ५० सामन्यात विजय मिळाला आहे, तर ५६ सामन्यांमध्ये पराभव मिळाला आहे. याव्यतिरिक्त ३ सामने बरोबरीत सुटले आहेत, तर ४ सामने अनिर्णित राहिले आहेत. विराटने हे सर्व सामने केवळ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळले आहेत.
४. १०७ सामने- रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
आयपीएलचा सर्वात यशस्वी संघांपैकी एक मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्त्वात आयपीएलचे ४ विजेतेपद जिंकून देणारा रोहित शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने २०१३ ते २०२० या आयपीएल हंगामादरम्यान कर्णधार म्हणून सर्वाधिक १०७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ६१ सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे, तर ४३ सामन्यांमध्ये पराभव मिळाला आहे. याव्यतिरिक्त ३ सामने बरोबरीत सुटले आहेत. हे सर्व सामने त्याने मुंबई इंडियन्स संघाकडून खेळले आहेत.
५. ७४ सामने- ऍडम गिलख्रिस्ट (डेक्कन चार्जर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब)
दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने २००८ ते २०१३ या आयपीएल हंगामादरम्यान कर्णधार म्हणून सर्वाधिक ७४ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ३५ सामन्यात विजय मिळाला आहे, तर ३९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. हे सर्व सामने त्याने डेक्कन चार्जर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघांकडून खेळले आहेत.
६. ५५ सामने- शेन वॉर्न (राजस्थान रॉयल्स)
फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएलच्या पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून देणाऱ्या शेन वॉर्नने २००८ ते २०११ या आयपीएल हंगामादरम्यान कर्णधार म्हणून सर्वाधिक ५५ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ३० सामन्यात विजय मिळाला, तर २४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. याव्यतिरिक्त १ सामना बरोबरीत सुटला. हे सामने त्याने केवळ राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळले आहेत.
७. ५३ सामने- वीरेंद्र सेहवाग (दिल्ली डेअरडेविल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब)
विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने २००८ ते २०१५ या आयपीएल हंगामादरम्यान कर्णधार म्हणून सर्वाधिक ५३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला २८ सामन्यात विजय मिळाला, तर २४ सामन्यात पराभव मिळाला. याव्यतिरिक्त १ सामना बरोबरीत सुटला. सेहवागने हे सर्व सामने दिल्ली डेअरडेविल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघांकडून खेळले आहेत.
८. ५१ सामने- सचिन तेंडुलकर (मुंबई इंडियन्स)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २००८ ते २०११ या आयपीएल हंगामादरम्यान कर्णधार म्हणून सर्वाधिक ५१ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ३० सामन्यात विजय मिळाला, तर उर्वरित २१ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हे सामने त्याने केवळ मुंबई इंडियन्स संघाकडून खेळले आहेत.
९. ५० सामने- डेविड वॉर्नर (दिल्ली डेअरडेविल्स आणि सनरायझर्स हैदराबाद)
धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरने २०१३ ते २०२० या आयपीएल हंगामादरम्यान कर्णधार म्हणून सर्वाधिक ५० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला २७ सामन्यात विजय मिळाला, तर उर्वरित २३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. हे सामने त्याने दिल्ली डेअरडेविल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळले आहेत.
ट्रेंडिंग लेख-
असा भारतीय खेळाडू ज्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना आणले होते रडकुंडी
जाणून घ्या आयपीएलमधील सर्व संघाच्या प्रशिक्षकांचा पगार, मुंबईच्या प्रशिक्षकाला मिळतोय…
क्या बात है! २००८ पासून आजपर्यंत ‘ते’ खेळत आहेत आयपीएल, हा विदेशी खेळाडूही यादीत
महत्त्वाच्या बातम्या-
आमचं नाव तेव्हाही आणि आताही.! पाहा आयपीएलचा पहिला आणि तेरावा हंगाम खेळणारे ‘महारथी’
खबरदार! मिस्टर ३६० च्या हेल्मेटवर चेंडू माराल, तर…
मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाने केली केदार जाधवच्या गोलंदाजीची नक्कल, फोटो होतोय व्हायरल