सर्वात मोठ्या टी20 लीगमध्ये गणना होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा 16वा हंगाम दिमाखात पार पडत आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत आतापर्यंत 8 सामने पार पडले आहेत. तसेच, नववा सामना गुरुवारी (दि. 6 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात रंगला. या सामन्यात मैदानात पाऊल ठेवताच कोलकाताचा अनुभवी खेळाडू सुनील नारायण याने खास विक्रम नावावर केला. काय आहे त्याचा विक्रम चला जाणून घेऊयात…
सुनील नारायणचा विक्रम
सुनील नारायण याने कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Kolkata Knight Riders) संघातील नवव्या सामन्यात जबरदस्त कारनामा केला. खरं तर, हा नारायणच्या आयपीएल कारकीर्दीतील 150वा सामना आहे. त्यामुळे तो एकाच आयपीएल फ्रँचायझीकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. तो अशी कामगिरी करणारा आयपीएल इतिहासातील सातवा, तर कोलकाताचा पहिलाच खेळाडू ठरला.
The 𝗠𝗮𝗴𝗶𝗰𝗶𝗮𝗻 completes 1️⃣5️⃣0️⃣ shows 🪄🎩#KKRvRCB | #AmiKKR | #TATAIPL 2023 pic.twitter.com/7hIAAuyf58
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2023
आयपीएलमध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली (Virat Kohli) अव्वलस्थानी आहे. विराट आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून 16व्या हंगामापर्यंत बेंगलोर संघाकडूनच खेळत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये बेंगलोरकडून 225 सामने खेळले आहेत. विराटनंतर दुसऱ्या स्थानी एमएस धोनी (MS Dhoni) आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाकडून 206 सामने खेळले आहेत. तिसऱ्या स्थानी कायरन पोलार्ड असून त्याने मुंबई इंडियन्सकडून 189 सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर रोहित शर्मा हा चौथ्या स्थानी असून त्यानेही मुंबईकडूनच 183 सामने खेळले आहेत.
याव्यतिरिक्त पाचव्या स्थानी सुरेश रैना असून त्याने चेन्नईकडून 176 सामने खेळले आहेत. तसेच, सहाव्या स्थानी एबी डिविलियर्स असून त्याने बेंगलोरकडून 156 सामने खेळले आहेत. यानंतर आता सातव्या स्थानी सुनील नारायण असून तोदेखील 150 सामन्यांच्या क्लबमध्ये आला आहे. (Most matches for a single IPL franchise Sunil Narine in the list)
आयपीएलमध्ये एका संघासाठी सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
225 – विराट कोहली (बेंगलोर)
206 – एमएस धोनी (चेन्नई)
189 – कायरन पोलार्ड (मुंबई)
183 – रोहित शर्मा (मुंबई)
176 – सुरेश रैना (चेन्नई)
156 – एबी डिविलियर्स (बेंगलोर)
150* – सुनील नारायण (कोलकाता)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेकीचा कौल ‘या’ संघाच्या पारड्यात, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
विराटचा विक्रम मोडणार ऋतुराज गायकवाड? आयपीएलवर एकहाती सत्ता मिळवण्याची संधी