---Advertisement---

थाला-चिन्नाथाला जोडीचा मैदानावर उतरताच विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारी आयपीएलमधील एकमेव जोडी

On: शनिवार, एप्रिल 10, 2021 9:38 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला शुक्रवारपासून (९ एप्रिल) सुरुवात झाली. या हंगामातील दुसरा सामना आज (१० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होत आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी व सुरेश रैना यांनी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.

एकत्रितरित्या खेळले इतके सामने
मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान हंगामातील दुसरा सामना खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आपल्या आयपीएल कारकिर्दीतील २०५ वा सामना खेळत आहे. वैयक्तिक कारणास्तव मागील हंगामाला मुकलेला वरिष्ठ खेळाडू सुरेश रैना या सामन्यातून आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे.

या सामन्यात मैदानावर उतरताच धोनी व रैना जोडीने आयपीएलमध्ये एकत्रितरीत्या १६० सामने खेळण्याचा विक्रम केला. पहिल्या आयपीएल हंगामापासून दोघेही चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहेत. २०१६, २०१७ व २०१९ असे केवळ तीनच हंगाम ते एकसाथ खेळले नाहीत.

एकत्रितरित्या आयपीएलमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक सामने खेळणारी दुसरी जोडी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार कायरन पोलार्ड यांची आहे. त्यांनी मुंबई इंडियन्ससाठी १४६ सामने आत्तापर्यंत खेळले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील फलंदाजांची सर्वात यशस्वी जोडी एबी डिव्हिलियर्स व विराट कोहली या जोडीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी एकसाथ १४१ आयपीएल सामन्यात सहभाग घेतला आहे.

चेन्नईची फटकेबाजी
फलंदाजीचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर चेन्नईची सुरुवात खराब झाली व फाफ डु प्लेसिस व ऋतुराज गायकवाड ही सलामीची जोडी ७ धावांत माघारी परतली. त्यानंतर, मोईन अलीने २४ चेंडूत ३६ धावांची वेगवान खेळी केली. सुरेश रैनाने सर्वाधिक ५४ धावा करत संघाला १८८ धावा उभारुन देण्यात मोलाची भूमिका बजावली.

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबीविरुद्ध हार्दिक पंड्याने का केली नाही गोलंदाजी? ‘हे’ आहे त्यामागचे कारण

CSK vs DC Live: रैना पाठोपाठ सॅम करनची वादळी खेळी, चेन्नईचे दिल्लीला १८९ धावांचे आव्हान

आयपीएलचा लोगो तुझ्यासाठीच बनवला आहे! ‘मिस्टर ३६०’ च्या चौफेर फटकेबाजीवर दिग्गज फलंदाज फिदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---