बंगळुरु। काल(19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक वनडे सामना पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत वनडे मालिकाही 2-1 ने जिंकली.
या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने विक्रमी शतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबच एक खास विक्रमही केला आहे. त्याने 128 चेंडूत 119 धावांची खेळी करताना 8 चौकार आणि 6 षटकार मारले. हे त्याचे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 वे वनडे शतक आहे.
त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीची बरोबरी केली आहे.
विराटनेही ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 वनडे शतके केली आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करण्याचा विक्रम सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 शतके केली आहेत.
वनडेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
9 शतके – सचिन तेंडूलकर (71 सामने)
8 शतके – विराट कोहली (40 सामने)
8 शतके – रोहित शर्मा (40 सामने)
6 शतके – देडमंड हाईन्स (64 सामने)
5 शतके – फाफ डू प्लेसिस (22 सामने)
ना धोनी ना पाँटिंग, कॅप्टन कोहली ठरतोय सगळ्यांनाच भारी!
वाचा👉https://t.co/A1VDrlPcTB👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 19, 2020
मोहम्मद शमीचा जबरदस्त विक्रम; कुंबळ, श्रीनाथची केली बरोबरी
वाचा👉https://t.co/jLNUB0E5As👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS @MdShami11— Maha Sports (@Maha_Sports) January 19, 2020