सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज (12 जानेवारी) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताला 34 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतक केले आहे.
त्याने 129 चेंडूत 133 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. त्याला मार्कस स्टॉयनिसने बाद केले. रोहितचे हे ऑस्ट्रेलिया विरुद्धचे 7 वे वनडे शतक ठरले आहे. यातील 4 शतके त्याने ऑस्ट्रेलियामध्ये तर 3 शतके भारतात केली आहेत.
त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने विंडीजचे माजी क्रिकेटपटू देसमोंद हाइन्स यांच्या 6 शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये 9 शतके केली आहेत. तसेच या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत 5 शतके केली आहेत.
आज झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 288 धावसंख्या उभारत भारतासमोर 289 धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र भारताला 50 षटकात 254 धावाच करता आल्या. भारताकडून रोहित बरोबरच एमएस धोनीने 51 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली लढत दिली होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू –
9 शतके – सचिन तेंडुलकर (सामने – 71)
7 शतके – रोहित शर्मा (सामने – 29)
6 शतके – देसमोंद हाइन्स (सामने – 64)
5 शतके – विराट कोहली (सामने – 29)
4 शतके – फाफ डुप्लेसीस (सामने – 21)
4 शतके – व्हीव्हीएस लक्ष्मण (सामने – 21)
4 शतके – ग्रॅहम गुच (सामने – 32)
महत्त्वाच्या बातम्या-
–काय सांगता! या संघाने जिंकले १००० सामने…
–हिटमॅन रोहित शर्माने केली गांगुलीच्या दादा विक्रमाशी बरोबरी
–इतक्या दिवसाची प्रतिक्षा असलेला एमएस धोनीचा तो विक्रम अखेर पूर्ण