21 जूनला पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया सामन्यात इंग्लंडने 6 विकेटने विजय मिळवला. पण या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून शतक केलेल्या अॅरॉन फिंचने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
वनडेमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने आत्तापर्यंत 6 वेळा शतके केली आहेत. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे.
त्याने या सामन्यात 106 चेंडूत 100 धावा केल्या आहेत. यात त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.
फिंचने आत्तापर्यंत आॅस्ट्रेलियाकडून खेळताना वनडेत 92 सामन्या 38.38 च्या सरासरीने 3706 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 11 शतकांचा आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे फिंचने अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. त्यामुळे एकही कसोटी न खेळता वनडेत 11 शतके करणारा तो पहिला खेळाडू आहे.
एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. त्याने आॅस्ट्रेलिया विरुद्ध 9 शतके केली आहेत.
हे आहेत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे खेळाडू (आयसीसीचे पहिले 10 पूर्ण सदस्य ):
विरुद्ध आॅस्ट्रेलिया – सचिन तेंडूलकर- 9 शतके
विरुद्ध श्रीलंका – सचिन तेंडूलकर/विराट कोहली – 8 शतके
विरुद्ध भारत – सनथ जयसुर्या – 7 शतके
विरुद्ध इंग्लंड- अॅरॉन फिंच – 6 शतके
विरुद्ध न्यूझीलंड – रिकी पॉन्टींग / विरेंद्र सेहवाग – 6 शतके
विरुद्ध द. आफ्रिका – सचिन तेंडूलकर- 5 शतके
विरुद्ध विंडिज – हाशिम आमला / एबी डेविलियर्स / हार्षेल गिब्ज -5 शतके
विरुद्ध पाकिस्तान- सचिन तेंडूलकर / ब्रायन लारा – 5 शतके
विरुद्ध झिम्बाब्वे- सचिन तेंडूलकर- 5 शतके
विरुद्ध बांग्लादेश – कुमार संगकारा – 5 शतके
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीने मांडली गोलंदाजांची व्यथा..
–विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी ही आहे आनंदाची बातमी
–टीम इंडिया शनिवारी आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना