---Advertisement---

विराट कोहलीने मांडली गोलंदाजांची व्यथा..

On: शुक्रवार, जून 22, 2018 7:47 PM
---Advertisement---

मागील काही दिवसांपासून क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजीचे अनेक विक्रम ऐकायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच 19 जूनला झालेल्या इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया सामन्यात इंग्लंडने वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली.

या विक्रमानंतर एका वनडे सामन्यात दोन चेंडू वापरण्याच्या नियमावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही या नियमाबाबत ट्विट करुन टिका केली. आता विराट कोहलीनेही वनडेमध्ये दोन चेंडू वापरल्याने गोलंदाजांना तोटा होत असल्याचे म्हटले आहे. 

https://twitter.com/sachin_rt/status/1009889444663472128

आयरलँड दौऱ्यावर जाण्यापुर्वी विराट पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी तो म्हणाला, “मी दोन चेंडू वापरण्याबाबत बरचं वाचले आहे आणि मी मान्य करतो की ही गोलंदाजांसाठी चांगली गोष्ट नाही. जर नवीन चेंडू घेऊन खेळण्यासाठी मदत करणारी खेळपट्टी नसेल तर गोलंदाजांच्या दृष्टीने आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी खूप कमी संधी आहे.”

“मी वनडे क्रिकेट एका चेंडूनेही खेळलो आहे. त्यावेळी फक्त एकच नवीन चेंडू वापरण्याची परवानगी होती. त्यामुळे गोलंदाजाचा रिव्हर्स स्विंग महत्त्वाची कामगिरी बजावायचा. त्यामुळे फलंदाजी करणे आव्हानात्मक होती.”

“सध्या मला खरचं वाटते जर खेळपट्टी फ्लॅट असेल आणि त्याचबरोबर दोन चेंडूं घेऊन खेळणे गोलंदाजांसाठी अवघड आहे. जर तूमच्या संघात व्रिस्ट स्पिनर्स असतील तर ते मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करू शकतात पण प्रत्येक संघात असे गोलंदाज नसतात.”

पण याबरोबरच विराटने विश्वास दिला की भारतीय संघ जुलै महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करेल. त्याने सांगितले की मधल्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी भारतीय संघात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल आहेत. त्याचबरोबर त्याने सांगितले की दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्यांनी चांगली कामगिरी केली होती.

भारतीय संघ उद्या 23 जूनला आयरलँड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात अनुक्रमे 27 आणि 29 जूनला भारत विरुद्ध आयरलँडमध्ये दोन टी20 सामने होणार आहेत.

यानंतर भारताचा संघ तेथूनच थेट 3 महिन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 3 टी20, 3 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी ही आहे आनंदाची बातमी

टीम इंडिया शनिवारी आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना

Video: रशीद खानच्या भावाची गोलंदाजी पाहिली का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment