मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव 48.4 षटकात 230 धावांवर संपूष्टात आला आहे. त्यामुळे भारतासमोर हा सामना जिंकण्यासाठी 231 धावांचे आव्हान आहे.
या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक ठोकले आहे. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 70 वे अर्धशतक ठरले आहे.
तसेच धोनीचे वन-डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियातील हे 8 वे अर्धशतक आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक वनडे अर्धशतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत धोनी दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने भारताचे माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांच्या ऑस्ट्रेलियातील 7 वनडे अर्धशतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने 10 अर्धशतके ऑस्ट्रेलियामध्ये केली आहेत.
तसेच धोनीने ऑस्ट्रेलियामध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. असा करणारा तो भारताचा चौथाच क्रिकेटपटू आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी हा पराक्रम केला आहे.
या सामन्यात त्याने भारतीय कर्णधार विराट कोहली बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची रचली आहे.
ऑस्ट्रेलियात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे भारतीय खेळाडू-
सचिन तेंडुलकर- 10
एमएस धोनी – 8*
के श्रीकांत – 7
महत्त्वाच्या बातम्या-
–कोहली, तेंडुलकर प्रमाणे एमएस धोनीनेही केला ऑस्ट्रेलियामध्ये ‘तो’ कूल विक्रम
–१५ वर्षांनंतर चहलमुळे ऑस्ट्रेलियन भूमीत घडला बाप योगायोग
–…आणि युजवेंद्र चहलने गुरजी रवी शास्त्रींचा २८ वर्षे जूना विक्रम मोडला