वनडेत एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडचा कर्णधार ऑयन माॅर्गनच्या नावावर आहे. त्याने आयसीसी क्रिकेट विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात १८ जून २०१९ रोजी ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी करताना ४ चौकार व १७ षटकार मारले होते.
ऑयन माॅर्गननंतर या यादीत तीन खेळाडू असे आहेत ज्यांनी वनडेत १६ षटकार मारले आहे. यात बेंगलोर येथे २०१३मध्ये २०९ धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५८ चेंडूत १२ चौकार व १६ षटकार मारले होते.
त्यानंतर एबी डिविलियर्सने १८ जानेवारी २०१५ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध ४४ चेंडूत १४९ धावा करताना ९ चौकार व १६ षटकार मारले होते.
तर युनिवर्सल बाॅस ख्रिस गेलने २४ फेब्रुवारी २०१५ रोजी आयसीसी क्रिकेट विश्वचषकात द्विशतकी खेळी करताना १० चौकार व १६ षटकार मारले होते. त्याने झिंबाब्वेविरुद्ध या खेळीत १४७ चेंडूत २१५ धावा केल्या होत्या.
वनडे डावात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
१७- ऑयन माॅर्गन
१६- रोहित शर्मा
१६- एबी डिव्हिलिअर्स
१६- ख्रिस गेल
भारतीय खेळाडूंनी एका डावात वनडेत मारलेले सर्वाधिक षटकार
१६- रोहित शर्मा
१२- रोहित शर्मा
१०- एमएस धोनी
९- रोहित शर्मा
८- युसूफ पठाण
८- रोहित शर्मा
महत्त्वाचे लेख
तीन द्विशतकांपैकी हे द्विशतक रोहितचे खास
ड्रीम ११: लग्न न झालेल्या क्रिकेटपटूंची टीम इंडिया
ड्रीम ११: फक्त कन्यारत्नं असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम…