---Advertisement---

टीम इंडियाचा नाद करायचा नाय! आव्हानाचा पाठलाग करताना ‘इतक्यांदा’ मिळवलाय विजय, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड लांबच

On: रविवार, ऑक्टोबर 9, 2022 11:46 PM
Team-India-Against-South-Africa
---Advertisement---

भारतीय संघाने रविवारी (दि. 9 ऑक्टोबर) रांची येथे पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सने धूळ चारत पहिल्या वनडे सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीच, पण त्यासोबतच भारताने वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. यामध्ये बलाढ्य समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांसारखे देशही भारतापासून बरेच दूर आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे आव्हान 50 षटकांपूर्वीच पूर्ण
भारतीय संघाने (Team India) या सामन्यात नाणेफेक गमावली होती. मात्र, नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागूनही त्यांना हा सामना जिंकता आला नाही. पाहुण्या संघाचा प्रभारी कर्णधार केशव महाराज (Keshav Maharaj) याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 278 धावा चोपल्या होत्या. भारताने हे आव्हान 45.5 षटकात 3 विकेट्स गमावत 282 धावा ठोकत पूर्ण केले.

https://twitter.com/BCCI/status/1579134470099460096

भारतीय संघ अव्वलस्थानी
या विजयासह भारताने आव्हानांचा पाठलाग करताना सर्वाधिक वनडे सामने जिंकण्याचा मान पटकावला. आव्हानाचा पाठलाग करताना भारताने जिंकलेला हा 300 वा वनडे सामना होता. या यादीत भारताच्या जवळपासही कोणता संघ नाहीये. भारत या यादीत अव्वलस्थानी आहे. भारतानंतर आव्हानांचा पाठलाग करताना सर्वाधिक वनडे सामने जिंकणाऱ्या संघांमध्ये दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे. त्यांनी 257 सामने जिंकले आहेत. त्यानंतर 237 विजयांसह वेस्ट इंडिज तिसऱ्या, 235 विजयांसह पाकिस्तान चौथ्या आणि 223 विजयांसह इंग्लंड संघ पाचव्या स्थानी आहे.

भारतीय संघाचा डाव
दक्षिण आफ्रिकेच्या 279 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून श्रेयस अय्यर याने शतक पूर्ण केले. त्याने 111 चेंडूंचा सामना करताना नाबाद 113 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 15 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त इशान किशन (93), संजू सॅमसन (30), शुबमन गिल (28) आणि कर्णधार शिखर धवन (13) या खेळाडूंनीही योगदान दिले. पाहुण्या संघाकडून गोलंदाजी करताना जॉर्न फोर्टुइन, वेन पार्नेल आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एक विकेट आपल्या नावावर केली.

आव्हानाचा पाठलाग करताना वनडेत सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
300 सामने- भारत*

257 सामने- ऑस्ट्रेलिया
237 सामने- वेस्ट इंडिज
235: सामने- पाकिस्तान
223 सामने- इंग्लंड

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मूर्ती लहान, कीर्ती महान! इशानने 24 वर्षांच्या वयात केला ‘हा’ पराक्रम, ‘माही भाई’ टेबल टॉपर
दक्षिण आफ्रिकेला पुरून उरलाय इशान, गांगुली अन् रोहितलाही न जमलेला पराक्रम पठ्ठ्यानं दाखवलाय करून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---