---Advertisement---

७ वर्षांपुर्वीचा तेंडुलकर-सेहवागचा विक्रम हिटमॅन- गब्बरने मोडला

On: सोमवार, ऑक्टोबर 29, 2018 2:18 PM
---Advertisement---

मुंबई। भारत विरुद्ध विंडीज संघात ब्रेबॉर्न स्टेडीयमवर सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचे सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि रोहित शर्मा या जोडीने एक खास विक्रम केला आहे.

या दोघांची जोडी वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारी दुसऱ्या क्रमांकाची सलामीवीर जोडी ठरली आहे. त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्या जोडीला मागे टाकले आहे.

तेंडुलकर आणि सेहवाग यांनी सलामीला खेळताना 93 डावात 42.12 च्या सरासरीने 3919 धावा केल्या आहेत. त्यांच्या या भागीदारीचा विक्रम रोहित आणि शिखरने 87 व्या डावात खेळताना पार केला आहे.

त्याचबरोबर रोहित आणि शिखर यांची जोडी वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांच्या जोडीमध्ये चौथ्या क्रमांकावर आली आहे. या यादीत सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांची जोडी अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी 136 डावात 49.32 च्या सरासरीने 6609 धावा केल्या आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या सलीमीवीरांच्या जोड्या-

6609 – सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली

3920* – रोहित शर्मा – शिखर धवन

3919 – सचिन तेंडुलकर – विरेंद्र सेहवाग

1870 – गौतम गंभीर – विरेंद्र सेहवाग

1680 – सुनील गावस्कर – के श्रीकांत

महत्त्वाच्या बातम्या:

ब्रेबॉर्नवर होणाऱ्या ऐतिहासिक वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया

ISL 2018: जमशेदपूरचे प्रशिक्षक फरांडो यांच्यासाठी आता प्रत्येक लढत म्हणजे फायनलच

ISL 2018: गोव्याची विजयाची हॅट्ट्रीक

Video: शतक साजरे करणाऱ्या रहाणेला या कारणामुळे सुरेश रैनाने थांबवले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment