भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात मंगळवारी (दि. 08 ऑगस्ट) 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. हा सामना भारतासाठी ‘करो या मरो’ होता. या सामन्यात भारताने पराभव पत्करला असता, तर मालिका गमवावी लागली असती. मात्र, सूर्यकुमार यादव याच्या जबरदस्त खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला. विशेष म्हणजे, सूर्याने भारताला फक्त सामनाच जिंकून दिला नाही, तर त्याने अवघ्या 51 सामन्यात तो कारनामा केला, जो करण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंना वर्षोनुवर्षे लागली. चला तर सूर्याच्या कामगिरीविषयी जाणून घेऊयात…
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मालिकेतील पहिल्या दोन टी20 सामन्यात लवकर तंबूत परतला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात तो पुन्हा फॉर्ममध्ये आला आणि भारतीय संघाचे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले. सूर्याने यादरम्यान 44 चेंडूंचा सामना करताना 83 धावांची झंझावाती खेळी साकारली. त्याने या धावा करताना 4 षटकार आणि 10 चौकारांची बरसातही केली.
याच खेळीच्या जोरावर सूर्याला विजयानंतर ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. अशाप्रकारे सूर्याने आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील 12वा पुरस्कार पटकावला. त्याने या विक्रमात रोहित शर्मा (Rohit Sharma) याची बरोबरी केली आहे. रोहितने 11 सामनावीर पुरस्कार पटकावले होते. त्यासाठी त्याला 148 टी20 सामने खेळावे लागले होते, तर सूर्याने फक्त 51 टी20 सामन्यात त्याला मागे टाकले.
For his breathtaking match-winning knock in the third #WIvIND T20I, Suryakumar Yadav bags the Player of the Match award 🙌 🙌
Scorecard ▶️ https://t.co/3rNZuAiOxH #TeamIndia pic.twitter.com/vFQQYFUKOC
— BCCI (@BCCI) August 8, 2023
दुसरीकडे, विराट कोहली (Virat Kohli) यानेही त्याच्या टी20 कारकीर्दीतील 115 सामन्यात 15 सामनावीर पुरस्कार पटकावले आहेत. मात्र, सूर्या विराटच्या दिशेने वेगाने जाताना दिसत आहे. विराटला 15 पुरस्कार जिंकण्यासाठी अनेक वर्षे लागली, तिथे सूर्याने फक्त 1 वर्षात हा कायापालट केला आहे. तो लवकरच विराटला या विक्रमात पछाडून अव्वल स्थान पटकावू शकतो.
कसोटी आणि वनडेतही आजमावले नशीब
टी20 क्रिकेटमधील सूर्यकुमारची कामगिरी पाहून त्याला कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्येही खेळवण्यात आले आहे. मात्र, मोठ्या क्रिकेट प्रकारात सूर्याची बॅट कायम शांतच असल्याचे दिसते. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला वनडेत एकही अर्धशतक करता आले नव्हते. आता त्याला विश्वचषकाचे महत्त्व लक्षात घेऊन संधी दिली जाते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (most player of the match awards in t20i suryakumar yadav left behind virat kohli and rohit sharma read)
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर ‘सूर्यो’दय झालाच! 4 षटकार मारताच केला जबरदस्त Record, फक्त 2 भारतीयांना जमली होती कामगिरी
विजयानंतर आत्मविश्वासाने फुगली पंड्याची छाती; विंडीजच्या विस्फोटक फलंदाजाला दिले खुले चॅलेंज; म्हणाला…