---Advertisement---

आज कोहलीला आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंग का आहे हे दाखविण्याची संधी

On: रविवार, जानेवारी 19, 2020 1:00 PM
---Advertisement---

बंगळूरु। आज (19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.

त्याने जर या सामन्यात 44 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ब्रायन लारा आणि ओयन मॉर्गन यांना मागे टाकत 5 व्या क्रमांकावर येण्याची संधी आहे.

सध्या विराट या यादीत 7 व्या क्रमांकावर आहे. त्याचे सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध 39 सामन्यात 53.55 च्या सरासरीने 1821 धावा आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडूलकर असून त्याने 71 वनडे सामन्यात 3077 धावा केल्या आहेत. तसेच या यादीत देसमंड हाइन्स (2262) दुसऱ्या, व्हिव रिचर्ड्स(2187) तिसऱ्या तर रोहित शर्मा(2089) चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मॉर्गन(1864) पाचव्या आणि लारा(1858) सहाव्या क्रमांकावर आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

3077 धावा – सचिन तेंडुलकर

2262 धावा – देसमंड हाईन्स

2187 धावा – व्हिव रिचर्ड्स

2089 धावा – रोहित शर्मा

1864 धावा – ओयन मॉर्गन

1858 धावा – ब्रायन लारा

1821 धावा – विराट कोहली

https://twitter.com/Maha_Sports/status/1218540925640531969

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---