कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणे तशी नक्कीच कठीण गोष्ट. आजकाल तर मोठ्या प्रमाणात आलेल्या स्पर्धेमुळे फारच कमी खेळाडूंचे पदार्पण २०व्या वर्षी होते.
ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये तर खेळाडू २४व्या वर्षीही आंतरराष्ट्रीय पदार्पण करतात. परंतु काही वर्षांपुर्वी अशी परिस्थिती नव्हती. अनेक खेळाडू अगदी १६व्या वर्षीही आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
विश्वास बसणार नाही परंतु अनेक खेळाडूंनी वयाची १९ पार करण्यापुर्वीच ५० वनडे सामने खेळले होते.यातील अनेक खेळाडूंनी १९व्या वयातच ४ वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द पुर्णही केली होती.
जगभरात २५७ खेळाडूंनी १९ वयापुर्वी वनडेत पदार्पण केले होते. यातील ४ खेळाडूंनी १९ वर्षांचे होण्यापुर्वी ५० किंवा अधिक वनडे सामने खेळले होते. विश्वास बसणार नाही परंतु १९व्या वाढदिवसापुर्वीच शाहिद आफ्रीदीने १०० वनडे सामने खेळले होते.
वनडेत १९व्या वाढदिवसापुर्वीच सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू व त्यांची कामगिरी
१०० सामने- शाहिद आफ्रिदी, धावा- २१९४, विकेट्स- ६४
६० सामने- आकिब जानेद, धावा- २०, विकेट्स- ७५
५६ सामने- सचिन तेंडूलकर, धावा- १५२०, विकेट्स- १३
५३ सामने- तमिम इक्बाल, धावा- १३७०, विकेट्स- ०
४८ सामने- राशिद खान, धावा- ६०२, विकेट्स- ११०
वनडेत १९व्या वाढदिवसापुर्वीच सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू
११० विकेट्स- राशिद खान, सामने- ४८
७५ विकेट्स- आकिब जावेद, सामने- ६०
७३ विकेट्स- साकलेन मुश्ताक, सामने- ३८
७० विकेट्स- वकार युनूस, सामने- ३६
६४ विकेट्स- शाहिद आफ्रिदी, सामने- १००
वनडेत १९व्या वाढदिवसापुर्वीच सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
२१९४ धावा- शाहिद आफ्रिदी, सामने- १००
१५२० धावा- सचिन तेंडूलकर, सामने- ५६
१३७० धावा- तमिम इक्बाल, सामने- ५३
७८८ धावा- इम्रान नझीर, सामने- ३५
७२० धावा- शाकिब अल हसन, सामने- २२
ट्रेंडिंग घडामोडी –
धोनीला २०११ विश्वचषकात युवराज किंवा युसुफला बसवुन या खेळाडूला घ्यायचं होतं संघात