नुकतेच विस्डेनने २०१९मध्ये उत्तम प्रदर्शन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट ५ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मात्र, त्यांच्या या यादीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला स्थान देण्यात आलेले नाही. २०१९मध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली होती. त्याने विश्वचषक २०१९मध्ये ५ शतके ठोकली होती.
यावरून भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विस्डेनवरती निशाना साधला आहे. यावेळी विस्डेनला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
डेली मिड-डे मधील आपल्या कॉलममध्ये गावसकर यांनी सांगितले आहे की, “आठवण ठेवा, कोणत्याही खेळाडूने १००० धावा जरी केल्या असतील आणि १०० विकेट्स जरी मिळवल्या असतील. पण, त्याने इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शन केले नसेल तर त्याला विस्डेनच्या यादीत स्थान मिळणार नाही. असे खूप वर्षांपासून होत आहे. जर ते इंग्लंडमध्ये झालेल्या गोष्टींनाच ते गुण देत असतील, तर कोण या यादीला आणि त्याच्या प्रकाशनाला विनाकारण जास्त महत्त्व देईल.”
गावसकर पुढे म्हणाले, “रोहितला विस्डेनच्या यादीत स्थान न मिळाल्याने त्याला काही फरक पडणार नाही. मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. ती अशी की, रोहित अजिबात त्याच्या स्थानावरून चिंता करणार नाही. तो आणि भारतीय संघातील इतर खेळाडू फक्त जिंकण्याचा जास्त विचार करत असतात. शिवाय रोहितला माहित आहे की त्याने विश्वचषकात संघासाठी उत्कृष्ट खेळी खेळी आहे.”
विस्डेनने २०१९च्या सर्वोत्कृष्ट ५ खेळाडूंमध्ये इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस आणि मार्नस लबुशने, एसेक्सचा फिरकी गोलंदाज सिमोन हार्मर आणि ऑस्ट्रेलिया महिला संघातील एलिसा पेरीला सामाविष्ट केले आहे.
या व्यतिरिक्त इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स आणि एलिसाला विस्डेन अल्मनॅक २०१९द्वारे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारे क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. तसेच, वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आंद्रे रसेलला टी२०चा सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू नियुक्त केले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास
-१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल
-या महान खेळाडूने सरळ सांगतिले, डीकाॅक नाही होऊ शकत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार