ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी (६ डिसेंबर) झाला. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसरा सामनाही भारतीय संघाने आपल्या खिशात घातला आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज शिखर धवनने एक जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला.
नाणेफेक जिंकून भारतीय संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत १९४ धावांचा डोंगर उभा केला होता. यजमान संघाच्या १९५ धावांचे हे आव्हान भारताने लिलया पार पाडत १९.४ षटकात पूर्ण केले.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शिखर धवनने सलामीला येत धमाकेदार फटकेबाजी केली. त्याने ३६ चेंडूत ५२ धावा करत अर्धशतक ठोकले. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ४ चौकारही ठोकले. हे अर्धशतक ठोकत त्याने एका खास विक्रमावर आपले नाव कोरले.
त्याने डावखुरा फलंदाज म्हणून खेळताना भारतीय संघाकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ठोकल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना त्याने सर्वाधिक १६२४ धावा केल्या. याबाबतीत त्याने सुरेश रैना, युवराज सिंग, गौतम गंभीर आणि रिषभ पंत यांसारख्या दमदार फलंदाजांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला.
डावखुरा फलंदाज म्हणून भारताकडून खेळताना रैना (१६०५ धावा), युवराज (११७७ धावा), गंभीर (९३२ धावा) आणि पंतने (४१० धावा) ठोकल्या आहेत.
यासोबतच धवन हा एकमेव डावखुरा फलंदाज आहे, ज्याने १० किंवा त्यापेक्षा अधिक अर्धशतके ठोकली आहेत.
यांतील सुरेश रैना, युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे डावखुरे भारतीय फलंदाज
१६२४* धावा- शिखर धवन
१६०५ धावा- सुरेश रैना
११७७ धावा- युवराज सिंग
९३२ धावा- गौतम गंभीर
४१० धावा- रिषभ पंत
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! दुसऱ्या टी२० सामन्यात चहल ठरला महागडा, ‘या’ नकोशा यादीत पटकावले अव्वल स्थान
ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली आठ वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर