---Advertisement---

दुसऱ्या टी२० मध्ये १९५ धावांचे लक्ष्य उभारूनही ऑस्ट्रेलियाचा होऊ शकतो पराभव? पाहा काय सांगते आकडेवारी

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (6 डिसेंबर) सिडनी येथे दुसरा टी20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यामुळेच ऑस्ट्रेलियाला 194 ही विशाल धावसंख्या गाठता आली. ही ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिल्या डावात उभारलेली तिसरी सर्वाधिक धावसंख्या आहे.

मात्र, मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा पराभव होईल, अशीच चर्चा सुरु आहे. आकडेवारीही हेच सांगतेय. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध टी20 सामन्यात याआधी जेव्हाही सर्वाधिक धावसंख्या उभारली आहे, त्या सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.

राजकोटमध्ये 201 धावा करूनही झाला पराभव

10 ऑक्टोबर 2013 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोट येथे एकमेव टी20 सामना खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 201 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने 19.4 षटकांत 6 गडी राखून हा सामना जिंकला होता.

सिडनीमध्येही भारताने ऑस्ट्रेलियाला लोळवलं

31 जानेवारी 2016 रोजी ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 198 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने याही सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

इतिहास पाहता भारतच जिंकणार सामना?

दुसऱ्या टी20 सामन्यातही ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध तिसरी सर्वाधिक धावसंख्या (194) उभारली. इतिहास पाहता याही सामन्यात भारत बाजी मारतो का, हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या –

नादच खुळा! भुवी अन् अश्विनला मागे टाकत चहलच्या नावावर खास विक्रमाची नोंद

खराब फॉर्मात असलेल्या धवनला सेहवागचा कानमंत्र, म्हणाला, “फलंदाजीसाठी मैदानात आल्यावर….”

दुर्दैव म्हणतात ते हे! विराटकडून झेल सुटूनही ऑस्ट्रेलियन कर्णधार झाला रनआऊट, पाहा Video

ट्रेंडिंग लेख –

HBD जड्डू! बॅटने तलवारबाजी करणाऱ्या ‘सर जडेजा’च्या ३ उत्कृष्ट खेळ्या

मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---