---Advertisement---

नादच खुळा! भुवी अन् अश्विनला मागे टाकत चहलच्या नावावर खास विक्रमाची नोंद

On: रविवार, डिसेंबर 6, 2020 4:39 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना झाला. यादरम्यान भारतीय फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने भुवनेश्वर कुमार आणि आर अश्विनला मागे टाकत खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू दमदार फलंदाजी करत आपल्या धावसंख्येत भर पाडत होता. यजमान संघाचा डाव ३ विकेट्स गमावत १२० असताना स्टीव्ह स्मिथ फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी स्मिथने संघाचा डाव सांभाळत चौकार- षटकारांचा पाऊस पाडत होता.

परंतु १८ वे षटक टाकण्यासाठी युझवेंद्र चहल आला. त्याने आपल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्मिथला हार्दिक पंड्याच्या हातून झेलबाद केले. आणि स्मिथसारख्या मोठ्या खेळाडूला तंबूत धाडले. या विकेटसह चहलने एक जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला. भारतीय संघाकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा त्याने केला. त्याने भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये एकूण ५९ विकेट्स घेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. याविक्रमात त्याने जसप्रीत बुमराहची बरोबरी केली आहे.

त्याने भुवनेश्वर कुमार आणि आणि आर अश्विनलाही मागे टाकले आहे. अश्विनने (५२) आणि भुवनेश्वरने (४१) विकेट्स घेतल्या आहेत.

टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

५९ विकेट्स*- युझवेंद्र चहल
५९ विकेट्स- जसप्रीत बुमराह
५२ विकेट्स- आर अश्विन
४१ विकेट्स- भुवनेश्वर कुमार

महत्त्वाच्या बातम्या-

‘बर्थडे बॉय’ श्रेयस अय्यरने टिपला अफलातून झेल, पाहा Video

‘हे हिंदू गद्दार आहेत…’, शेतकरी आंदोलनात युवराज सिंगच्या वडिलांचे वादग्रस्त विधान; Video जोरदार व्हायरल

VIDEO : ‘कन्कशन सब्टीट्यूट’ म्हणून चहलची निवड केल्याबद्दल थेट सामना रेफरीशी भिडले लँगर

ट्रेंडिंग लेख-

मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---