---Advertisement---

४ ओव्हरमध्ये ७० धावा देणारा कोण आहे हा सर्वात महागडा गोलंदाज

---Advertisement---

बेंगलोर | गुरुवारी राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात बेंगलोरने हैद्राबादवर १४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी केलेल्या बेंगलोरने हैद्राबादसमोर २० षटकांत जिंकण्यासाठी २१९ धावांचे लक्ष ठेवले होते.

एबी डिविलियर्स ६९, मोईन अली ६५, कोलिन डे ग्रॅडोहोम ४० आणि सर्फराज खान २२ यांच्या धुव्वादार फलंदाजीच्या जोरावर बेंगलोरने २० षटकांत ६ विकेट गमावत २१८ धावा केल्या.

याला उत्तर देताना हैद्राबादने २० षटकांत ३ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली. त्यात कर्णधार केन विलियमसन ८१ आणि मनिष पांडे ६२ यांनी चांगल्या धावा केल्या परंतु संघाला विजय मिळवुन देण्यात अपयशी ठरले.

या सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद बसिल थंपी ४ षटकांत तब्बल ७० धावा दिल्या. २४ वर्षीय थंपी याबरोबर आयपीएलमध्ये ४ षटकांत सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. २४ चेंडूत त्याने केवळ १ वाईड बाॅल टाकला.

२०१३ मध्ये इशांत शर्माने ४ षटाकांत ६६ धावा दिल्या होत्या. आता हा नकोसा विक्रम थंपीच्या नावावर जमा झाला आहे.

आठव्या षटकात त्याने १९, तेराव्या षटाकात १८, सोळाव्या षटकात १४ तर एकोणिसाव्या षटकात त्याने १९ अशा एकुण ७० धावा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment