---Advertisement---

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात एकटा गिल सर्वांना पुरून उरला; 6 डावात ठोकल्या 500पेक्षा जास्त धावा, बाकीचे…

On: गुरूवार, फेब्रुवारी 2, 2023 1:26 PM
Shubman-Gill-And-Hardik-Pandya
---Advertisement---

न्यूझीलंड संघ जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध 3 सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळली. यातील वनडे मालिकेत भारताने न्यूझीलंडला क्लीन स्वीप केले. त्यानंतर टी20 मालिकेत 2-1ने पराभवाचा धक्का दिला. या दौऱ्यातील शेवटचा टी20 सामना बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 168 धावांनी सर्वात मोठा टी20 विजय साकारला. यामध्ये शुबमन गिल या युवा फलंदाजाचा सिंहाचा वाटा होता. त्याने शतक झळकावत संघाला विजय मिळवण्यात मदत केली. विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. चला तर या मालिकांमध्ये कुणी किती धावा केल्या जाणून घेऊया…

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात दोन मालिका खेळण्यात आल्या. त्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका आधी खेळण्यात आली. या मालिकेत भारताने न्यूझीलंडला एकही सामना जिंकू दिला नाही. तसेच, क्लीन स्वीप करत मालिका खिशात घातली. या मालिकेत भारताकडून शुबमन गिल (Shubam Gill) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 3 सामने खेळताना 180च्या सरासरीने 360 धावा केल्या. दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 3 सामने खेळताना 62च्या सरासरीने 186 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यानेही तीन सामन्यातील 2 डावात खेळताना 82 धावा केल्या. याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यानेही तीन सामन्यातील 2 डावात खेळताना 45 धावांचे योगदान दिले.

यानंतर टी20 मालिकेतही भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान गिलनेच पटकावला. गिलने यावेळी 3 सामन्यात 72च्या सरासरीने 144 धावा केल्या. पंड्याने 66 धावा आणि सूर्यकुमारने 97 धावा केल्या.

दोन्ही मालिकेत शुबमन गिल अव्वल
अशाप्रकारे गिलने वनडेतील 360 आणि टी20तील 144 अशा एकूण दोन्ही मालिकेत 6 डावांमध्ये 504 धावा केल्या. दुसरीकडे, फक्त वनडेत खेळलेल्या रोहितने 3 डावात 186 धावा कुटल्या. पंड्याने वनडेतील 82 आणि टी20तील 66 अशा दोन्ही मालिकेत एकूण 6 डावात 148 धावा केल्या. याव्यतिरिक्त सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमारने वनडेतील 45 आणि टी20तील 97 अशा दोन्ही मालिकेत एकूण 6 डावात 142 धावा चोपल्या.

विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही मालिकेत एकट्या गिल याने एकूण 504 धावा केल्या, तर उर्वरित सर्व भारतीय खेळाडूंनी 781 धावा केल्या. (Most runs for India on this NZ’s tour to India)

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
504 धावा- शुबमन गिल (डाव- 6)

186 धावा- रोहित शर्मा (डाव- 3)
148 धावा- हार्दिक पंड्या (डाव- 6)
142 धावा- सूर्यकुमार यादव (डाव- 6)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कमबॅक करताच आर्चरचा दक्षिण आफ्रिकेत धमाका; कामगिरी अशी की, मुंबई इंडियन्सही होईल खुश
शुबमनचे कमी वयात भारताकडून टी20त शतक, पण वनडे अन् कसोटीत शतक मारणारे युवा भारतीय कोण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---