वेलिंग्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील टी२० मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाच नेतृत्व प्रभारी कर्णधार रोहित शर्मा करणार आहे.
भारतीय संघाने वनडे मालिका कालच ४-१ अशी जिंकली आहे. त्यामुळे टी२० मालिकेतही संघाकडून अशीच अपेक्षा आहे.
या टी२० मालिकेत रोहित शर्माला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. भारताकडून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ९वा खेळाडू होण्याची संधी रोहितला आहे.
रोहितने भारताकडून खेळाताना ३१८ सामन्यात ४२.७५च्या सरासरीने ११६३० धावा केल्या आहेत. यात त्याच्या २९ शतके आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे.
सध्या रोहित भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १०वा आहे. ९व्या स्थानावर असलेल्या युवराज सिंगने भारताकडून ३९९ आंतरराष्ट्रीय सामन्यात ३४.९८च्या सरासरीने ११६८६ धावा केल्या आहेत.
यामुळे तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत जर रोहितने ५९ धावा केल्या तर तो या यादीत ९व्या स्थानावर येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडिया विरुद्धच्या टी२० मालिकेला न्यूझीलंडचा हा स्पोटक खेळाडू मुकणार, जाणून घ्या कारण
–पुणेकर केदार जाधवसाठी एमएस धोनीचा मराठमोळा अंदाज, पहा व्हिडिओ
–मोहम्मद शमी अशी कामगिरी करणारा ठरला केवळ तिसराच वेगवान भारतीय गोलंदाज