वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत असे अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी सातत्याने आपल्या तुफान कामगिरीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक याचाही समावेश आहे. डी कॉक याने आतापर्यंत चालू स्पर्धेत सर्वाधिक 3 शतके ठोकली आहेत. स्पर्धेच्या 32व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात डी कॉकने अर्धशतक झळकावत आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या कुठल्याच खेळाडूला न जमलेला कारनामा केला आहे.
क्विंटन डी कॉकचा विक्रम
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी संघाकडून क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) आणि कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) फलंदाजीला उतरले. संघाला यावेळी 38 धावांवर बावुमाच्या रूपात पहिला झटका बसला. बावुमा ट्रेंट बोल्टच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डॅरिल मिचेलच्या हातून झेलबाद झाला. त्याला 24 धावांवर तंबूत परतावे लागले. मात्र, डी कॉकने टिच्चून फलंदाजी केली. यावेळी त्याने 73व्या चेंडूवर एक धाव घेत 56वी धाव पूर्ण केली. यानंतर त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
डी कॉक दक्षिण आफ्रिकेसाठी विश्वचषक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला. या खेळीसह त्याने विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक 486 धावा केल्या. त्याने या सामन्यात पुढे 85 चेंडूत 72 धावा करताच त्याच्या विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील 503 धावा पूर्ण झाल्या. अशाप्रकारे, तो दक्षिण आफ्रिकेकडूनही कोणत्याही विश्वचषक स्पर्धेच्या एका हंगामात 500हून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज बनला.
Quinton De Kock bidding farewell to ODI cricket on a high note. pic.twitter.com/7vL6GkKyxi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 1, 2023
त्याच्याआधी हा विक्रम जॅक कॅलिस याच्या नावावर होता. त्याने 2007 विश्वचषकात 485 धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी एबी डिविलियर्स असून त्याने 2015 विश्वचषकात 482 धावा केल्या होत्या. तसेच, 2007 विश्वचषकातील 443 धावांसह ग्रीम स्मिथ चौथ्या स्थानी आहे. यादीत पाचव्या स्थानी पीटर कर्स्टन असून त्यांनी 1992 विश्वचषकात 410 धावा केल्या होत्या.
वनडे विश्वचषकाच्या एका हंगामात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
503- क्विंटन डी कॉक, 2023*
485 – जॅक कॅलिस, 2007
482 – एबी डिविलियर्स, 2015
443 – ग्रीम स्मिथ, 2007
410 – पीटर कर्स्टन, 1992 (Most runs for South Africa in an ODI World Cup tournament quinton de kock on top)
हेही वाचा-
ओळख लपवून मुंबईच्या रस्त्यावर उतरताच सूर्याने केलं ‘हे’ काम, चाहता म्हणाला, ‘बॅटिंगच येत नाही…’
वर्ल्डकप चालू असताना धक्कादायक बातमी! इंग्लंडच्या स्टार खेळाडूने केली Retirementची घोषणा