माऊंट मॉनगनुई। आज(2 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पाचवा आणि शेवटचा टी20 सामना बे ओव्हल स्टेडियमवर पार पडला आहे. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. तसेच 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. या सामन्यात खेळताना केएल राहुलने एक मोठा पराक्रम केला आहे.
त्याने या सामन्यात 33 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आण 2 षटकार मारले. राहुलचे आता न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 56 च्या सरासरीने 224 धावा झाल्या आहेत. त्यामुळे तो एका द्विपक्षीय टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.
त्याने न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोला मागे टाकले आहे. मुन्रोने 2017-18 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 74.33 च्या सरासरीने 223 धावा केल्या होत्या. या यादीत अव्वल क्रमांकावर मोझांबिकचा दामियाओ कौआना आहे. त्याने मालावी विरुद्ध 7 सामन्यांच्या मालिकेत 233 धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे राहुल एका द्विपक्षीय टी20 मालिकेत भारताकडून 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाराही पहिला फलंदाज आहे. आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला द्विपक्षीय टी20 मालिकेत 200 पेक्षा अधिक धावा करता आल्या नव्हत्या.
#एका द्विपक्षीय टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
233 धावा – दामियाओ कौआना (मोझांबिक विरुद्ध मालावी,2019)
224 धावा – केएल राहुल (भारत विरुद्ध न्यूझीलंड,2020)
223 धावा – कॉलिन मुन्रो (न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज,2017-18)
#एका द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय –
224 धावा – केएल राहुल (विरुद्ध न्यूझीलंड,2020)
199 धावा – विराट कोहली (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2016)
183 धावा – विराट कोहली (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019)
164 धावा – केएल राहुल (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019)
162 धावा – रोहित शर्मा (विरुद्ध श्रीलंका, 2017)
चौथा टी२० सामना जिंकल्यानंतरही टीम इंडियाला आयसीसीने सुनावली शिक्षा, जाणून घ्या कारण
वाचा- ????https://t.co/nsML6hVj3Z????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ICC— Maha Sports (@Maha_Sports) February 2, 2020
पाचव्या टी२०मध्ये भारताला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त
वाचा????https://t.co/kb9pRFp7f3????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) February 2, 2020