---Advertisement---

रोहित, विराट की पॉंटिंग? ICCच्या फायनलमध्ये कोण आहे सगळ्यात भारी?

On: गुरूवार, मार्च 6, 2025 1:41 PM
---Advertisement---

(ICC Champions Trophy) यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीतील अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. हा सामना येत्या रविवारी म्हणजेच 9 मार्च रोजी दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. (India vs New Zealand Final Match) तत्पूर्वी स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात किवी संघाने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली. तर टीम इंडिया कांगारुंचा धुव्वा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दणक्यात एंट्री मारली. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्सने हरवले. दरम्यान आता एक मोठी आकडेवारी समोर येत आहे. जे की आयसीसी स्पर्धेत महान कामगिरी करणाऱ्या फलंदाजांबाबत आहे.

वास्तविक, ही आकडेवारी आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये केलेल्या कामगिरीची आहे. आजपर्यंत झालेल्या आयसीसी सामन्यांनमध्ये विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंग देखील विराटच्या मागे आहे. या यादीत रोहित शर्माचा देखील समावेश आहे. पाहा आकडेवारी विस्ताराने..

आयसीसीच्या स्पर्धांच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा

410- विराट कोहली (सामने- 8 )
320- कुमार संगकारा (सामने- 7)
318- ट्रॅविस हेड (सामने- 2)
270- माहेला जयवर्धने (सामने- 7)
262- ॲडम गिलख्रिस्ट (सामने- 4)
247- रिकी पॉंटिंग (सामने- 6)
246- रोहित शर्मा (सामने- 8)

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विविध स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. कोहलीने आतापर्यंत 8 अंतिम सामन्यांमध्ये 410 धावा केल्या आहेत. (Virat Kohli ICC Final Runs Record) तो यादीत अव्वल स्थानी आहे. श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज कुमार संगकारा 320 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅविस हेड अवघ्या 2 सामन्यांत 318 धावा करून तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माबद्दल बोलायचे झाल्यास या यादीत त्याचा क्रमांक सातव्यास्थानी लागतो. त्याने 8 आयसीसी फायनल सामन्यांमध्ये 246 धावा केल्या आहेत.

आता अश्या परिस्थितीत रोहित शर्माकडे येत्या रविवारी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये मोठी खेळी खेळत ही आकडेवारी सुधारण्याची संधी आहे. विराट देखील मोठी कामगिरी करु शकतो. कारण तो सध्या शानदार फाॅर्ममध्ये आहे. त्या सामन्यात तो जर शतक झळकवला तर आयसीसी फायनलमध्ये 500+ धावा करणारा पहिला जागतिक फलंदाज बनेल.

हेही वाचा-

SA VS NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या उपांत्य सामन्यात झाले 5 अभेद्य विक्रम, किवींचा अष्टपैलू खेळ!
आयसीसी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून भारताला दोनदा दणका, पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड!
मिलरची वादळी खेळी! सेहवागचा विक्रम मोडत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रचला नवा इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---