मुंबई। आयपीएलचा 11 वा मोसम आता अखेरच्या टप्यात आली आहे. मंगळवारी, 22 मेपासुन आयपीएल प्ले-आॅफला सुरवात होत आहे.
प्ले-आॅफमधील क्वालिफायर 1 चा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्याच रंगणार आहे. या सामन्यात चेन्नईचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाला आयपीएलमध्ये सर्वाधिक दावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी येण्याची संधी आहे.
त्याने सध्या १७४ सामन्यात ३४.४८च्या सरासरीने ४९३१ धावा केल्या आहेत. त्याला १६३ सामन्यात ४९४८ धावा करणाऱ्या विराट कोहलीच्या पुढे जायला केवळ १८ धावांची गरज आहे. तो जर अव्वल स्थानी आला तर त्याच्या नावावर हा विक्रम वर्षभर रहाणार आहे. कारण त्याला ज्या खेळाडूची या विक्रमासाठी स्पर्धा होती त्या विराटची टीम आयपीएलमधून बाहेर गेली आहे.
परवाच रैनाचा संघसहकारी आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने ४००० धावांचा टप्पा पार केला. यामुळे हा टप्पा पार करणारा तो केवळ सहावा भारतीय तर एकूण सातवा खेळाडू ठरला आहे.
याआधी आयपीएलमध्ये 4000 धावा विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, गौतम गंभीर, राॅबीन उथप्पा आणि डेविड वार्नर या खेळाडूंनी केला आहे. यामध्ये वार्नर एकमेव परदेशी खेळाडू आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
विराट कोहली: 4948 धावा (सामने- 163)
सुरेश रैना: 4931 धावा (सामने- 174)
रोहित शर्मा: 4493 धावा (सामने- 173)
गौतम गंभीर: 4217 धावा (सामने- 154)
राॅबीन उथप्पा: 4081 धावा (सामने- 163)
डेविड वार्नर: 4014 धावा (सामने- 114)
एमएस धोनी: 4007 धावा (सामने- 173)
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
४९४८- विराट कोहली
४९३१- सुरेश रैना
४४९३-रोहित शर्मा
४२१७- गौतम गंभीर
४०८१-राॅबीन उथप्पा
४०१४- डेविड वार्नर
४००७- एमएस धोनी#म #मराठी @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @Maha_Sports @BeyondMarathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) May 21, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–वाचा- वेळा बदलल्या आहेत मग आजचा सामना नक्की आहे तरी किती वाजता?
–जर आजचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज पराभूत झाले तर….
–जर्सी भारताची असो की चेन्नईची, धोनी विक्रम करताना काही थांबेना!
–तब्बल ११ आयपीएल वाट पहावे लागले आणि अखेर काल तो विक्रम घडलाच!
–व्हिडिओ व्हायरल- मुंबई हारली, पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटा खुष