इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट सातत्याने धावा करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत जो रूटची बॅट आग ओकत आहे. यासोबतच जो रूट कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहावा ठरला आहे. जो रूटने श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराला मागे टाकले आहे. कुमार संगकाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत 12400 धावा केल्या. त्याने 134 कसोटी सामन्यांच्या 233 डावात 12400 धावा केल्या. मात्र आता जो रूटने कुमार संगकाराला मागे टाकले आहे.
जो रूटने आतापर्यंत 146 कसोटी सामन्यांच्या 267 डावांमध्ये 12402 धावा केल्या आहेत. कुमार संगकाराने 57.40 च्या सरासरीने धावा केल्या. तर जो रूटची सरासरी 50.62 आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 200 कसोटी सामन्यांच्या 329 डावांमध्ये 15921 धावा आहेत. जो रूट आणि सचिन तेंडुलकर यांच्यात 3519 धावांचा फरक आहे. तसेच, जो रूट फक्त 33 वर्षांचा आहे. जो रूटने गेल्या तीन वर्षांत 3785 धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगनंतर कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जॅक कॅलिस पहिल्या क्रमांकावर आहे. रिकी पाँटिंगने आपल्या कसोटी कारकिर्दीत 13378 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिसच्या नावावर 13279 धावा आहेत. या यादीत राहुल द्रविड चौथ्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविडने कसोटीत 13288 धावा केल्या. या फलंदाजांनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकचे नाव आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 12472 धावा केल्या. ॲलिस्टर कुकनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूटचा समावेश झाला आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 263 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 62 धावांची आघाडी मिळाली. मात्र यानंतर श्रीलंकेने दमदार पुनरागमन केले. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 156 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना लहरु कुमराने सर्वाधिक 4 बळी घेतल्या. तर विश्वा फर्नांडो आणि असिथ फर्नांडो यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स मिळवल्या. अशाप्रकारे श्रीलंकेसमोर 219 धावांचे लक्ष्य आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेची धावसंख्या 1 गडी बाद 94 धावा आहे. सध्याच्या स्थितीत श्रीलंकेची सामन्यावर मजबूत पकड आहे.
हेही वाचा-
तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचे दमदार पुनरागमन; यजमान इंग्लंड पराभवाच्या उंबरठ्यावर
केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनवूनही भारतीय संघात स्थान नाही! श्रेयस अय्यरला वगळण्यामागचं कारण काय?
गौतम गंभीरनंतर कोण बनणार केकेआरचा मेंटॉर? 2 आयपीएल जिंकणाऱ्या दिग्गजाचं नाव आघाडीवर